करिअरनामा ऑनलाईन । नवीन वर्षात 22 जानेवारीला (Ayodhya Ram Mandir) अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या अभिषेक कार्यक्रमाची सध्या जोरात तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात देशवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आलं आहे. याआधी नव्या राम मंदिराच्या पुजाऱ्याचीही निवड झाली आहे. या भरतीसाठी सुमारे 3 हजार इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या.
कोण आहे नवा पुजारी
एका रिपोर्टनुसार अशी माहिती आहे, की गाझियाबादचा विद्यार्थी मोहित पांडे यांची अयोध्या राम मंदिराचा पुजारी म्हणून निवड करण्यात आली आहे. ते गाझियाबाद येथील दूधेश्वर वेद विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. सुमारे तीन हजार पुजाऱ्यांच्या मुलाखतींमधून 20 जणांची निवड करण्यात आली आहे, त्यापैकी (Ayodhya Ram Mandir) एक मोहित आहे. निवड झालेल्या सर्व पुजाऱ्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर त्यांची नियुक्ती केली जाईल. मोहित पांडे हा सीतापूर येथील रहिवासी आहे. त्याने दुधेश्वरनाथ वेद विद्यापीठातून सामवेदचे शिक्षण घेतले. सामवेदचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आचार्यचे शिक्षण घेण्यासाठी तो तिरूपतीला गेला. आचार्यची पदवी घेतल्यानंतर तो पीएचडीची देखील तयारी करत आहे. अशातच त्यानं राम मंदिराच्या पुजारी पदासाठी अर्ज केला होता, त्यात त्याची निवड झाली.
एवढा मिळणार पगार (Ayodhya Ram Mandir)
पूर्वी मुख्य पुजाऱ्याला २५ हजार आणि सहाय्यक पुजाऱ्याला २० हजार रुपये मिळत होते. मात्र आता राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याचं वेतन ३२,९०० रुपये आणि सहाय्यक पुजाऱ्याचा पगार ३१,९०० रुपये करण्यात आला. तसेच इतर पुजारी आणि सेवकांच्या पगारातही वाढ करण्यात आली आहे. ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यापूर्वी येथील मुख्य पुजारी आणि सहाय्यक पुजारी यांचे पगार खूपच कमी होते. त्या काळात मुख्य पुजाऱ्यांना केवळ १५,५२० रुपये तर सहाय्यक पुजाऱ्यांना ८,९४० रुपये एवढा पगार मिळत होता. वाढती महागाई पाहता मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी पगार वाढवण्याची मागणी केली होती. ही बाब लक्षात घेऊन ट्रस्टने मे महिन्यात पहिली वेतनवाढ दिली आणि मुख्य पुजाऱ्यांना २५ हजार आणि सहाय्यक पुजाऱ्यांना २० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा ऑक्टोबर महिन्यात मुख्य पुजाऱ्यांचा पगार २५ हजारांवरून ३२ हजार ९०० रुपये तर त्यांच्या सहाय्यक पुजाऱ्यांचा पगार ३१,००० रुपये करण्यात आला आहे.
23 जानेवारीपासून रामलल्लाचे दर्शन मिळणार
22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सर्व राम भक्तांना भव्य मंदिरात प्रभू रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिराच्या आतील बाजूने चोख व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाकडून प्रसाद वाटपासोबतच वाहतूक मार्ग सुरळीत करण्यावर भर दिला (Ayodhya Ram Mandir) जाणार आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक रामभक्ताला आरामात दर्शन घेता यावे, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. दररोज दीड ते अडीच लाख लोकांना प्रभू श्री रामाचे दर्शन घेता येणार आहे. चार रांगेत दर्शनाची व्यवस्था असणार आहे.
विमानतळही होतंय तयार
अयोध्येतील श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ 15 डिसेंबरपर्यंत तयार होणार असल्याची माहिती आहे. यासह विमानसेवाही सुरू होणार आहे. येथे 2200 मीटर धावपट्टी उघडली जाणार आहे, ज्यावर छोटी विमाने तसेच बोईंग 737, एअरबस 319 आणि एअरबस 320 सारखी मोठी विमाने उतरू शकतील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com