करिअरनामा ऑनलाईन । आपणा सर्वांना माहितच आहे; की (Ayodhya Ram Mandir Bharti 2023) उत्तर प्रदेशच्या अयोध्येमध्ये भव्य असे राम मंदिर उभारले जात आहे. हे मंदिर पूर्णपणे उभे राहिल्यानंतर मंदिरात धार्मिक सेवेसाठी अधिक पुजाऱ्यांची गरज भासणार आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने पूजऱ्यांची भरती जाहिर केली आहे. यासंदर्भात श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने इच्छूक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. दि. ३१ ऑक्टोंबरपर्यंत या पदासाठी अर्ज करता येणार आहे. भरतीसाठी उमेदवारांना प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे.
घ्यावे लागणार सहा महिन्यांचे प्रशिक्षण
उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण काळात उमेदवारांना २ हजार रुपये प्रति महिना मिळणार आहेत. त्यानंतर (Ayodhya Ram Mandir Bharti 2023) या उमेदवारांची पुजारी म्हणून मंदिरात नियुक्ती केली जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराचे निर्माण कार्य पूर्ण होईल.
राम मंदिर बनून पूर्ण होण्याच्या आधीच उमेदवारांची निवड करण्याची योजना ट्रस्टने आखली आहे. जेणेकरुन पुढील कार्यक्रमांमध्ये काही अडथळा येणार नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवारांचा उद्घाटनाच्या नियोजित कार्यक्रमासाठी वापर करता येईल. मकर संक्रातीनंतर मंदिराचे उद्घाटन होणार आहे. २१ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिराचे उद्घाटन करतील.
इतकी आहे वय मर्यादा (Ayodhya Ram Mandir Bharti 2023)
राम मंदिर उभारणीचे कार्य पाहणाऱ्या ट्रस्टने या भरती संदभात जाहीरात प्रसिद्ध केली आहे. मंदिरातील रामलल्लाची सेवा करण्यासाठी अनेक पुजाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. या पदासाठी अयोध्या क्षेत्रातील उमेदवारांना अधिक प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २० ते ३० च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
अशी होणार निवड
भरती कार्यक्रमात इच्छुक उमेदवारांची प्रवेश परीक्षा होणार आहे. त्यामध्ये पास होणाऱ्या उमेदवारांना सहा महिने प्रशिक्षण घ्यावे लागेल. प्रशिक्षणाच्या काळादरम्यान उमेदवारांच्या राहण्या-खाण्याची सोय ट्रस्टच करणार आहे. रामलल्लाची पूजा ही रामानंदीय परंपरेने होते. या पद्धतीने पूजा करण्याचं ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार आहे. उमेदवारांनी गुरुकुल येथून शिक्षा प्राप्त केलेली असावी तसेच रामानंदीय परंपरेनुसार दीक्षा घेतलेली असावी. ट्रेनिंग नंतर उमेदवाराची अंतिम निवड केली जाईल.
इथे करा अर्ज
ज्यांना पुजारी म्हणून काम करण्याची इच्छा आहे त्यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची अधिकृत वेबसाईट https://srjbtkshetra.org/ ला भेट देवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. याठिकाणी तुम्हाला नाव, गोत्र, वडिलांचे नाव, जन्म तारीख, पत्ता आणि शिक्षणासंबंधी माहिती भरायची आहे. दि. ३१ ऑक्टोबरपर्यंत या पदासाठी अर्ज करता येणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com