करिअरनामा ऑनलाईन | येणारे 21 वे शतक हे फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाने (Artificial Intelligence) लक्षात ठेवले जाईल. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) हा फक्त एक शब्द नसून हा एक बदल आहे. ह्या तंत्रज्ञानामुळे भविष्यात जगाचे रूप बदलणार आहे. जेव्हापासून मशीनची कल्पना अस्तित्वात आली तेव्हापासून AI ने लोकांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे. पण जास्त लोकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे? हे माहीतच नाही. तसेच ह्याचा वापर कुठे केला जातो? ह्याचे उपयोग काय आहेत? ह्याबद्दल कमी प्रमाणात माहिती आहे. त्यामुळे आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल हे निश्चित.
काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ?
आर्टिफिशयल इंटेलिजन्स हे टेक टिप्स कॉम्प्युटर सायन्स चा एक भाग आहे. AI ही यंत्रणा, विशेषत: संगणक प्रणालीद्वारे मानवी बुद्धिमत्ताचे नक्कल करून काम करते. AI तंत्रज्ञानाच्या मार्फत कोणतीही मशीन मनुष्या सारखे बोलू, वाचू किंवा कोणतीही गोष्ट सहज समजू शकते. AI तंत्रज्ञानाद्वारे कोणतीही मशीन मनुष्या सारखे स्वतः डोकं वापरून काम करू शकते. जसे की भाषा ओळखणे, विविध भाषेत बोलणे, आवाज ओळखणे, काम करणे, एकमेकांशी संवाद साधणे, इत्यादी गोष्टी करू शकते.
या क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर केला जातो (Artificial Intelligence)
आपण एआय तंत्रज्ञान कोण कोणत्या क्षेत्रात वापरले जाते ते पाहणार आहोत. AI तंत्रज्ञान अनेक क्षेत्रात वापरले जाते. AI तंत्रज्ञानामुळे कोणतेही काम अवघ्या काही मिनिटात करता येते. त्यामुळे ह्याचा वापर करून अनेक क्षेत्र विकसित होत आहेत. कोण कोणत्या क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरले जाते त्याबद्दल जाणून घेऊया.
- किरकोळ, खरेदी आणि फॅशन
- सुरक्षा आणि पाळत ठेवणे
- क्रीडा विश्लेषण आणि क्रियाकलाप
- उत्पादन
‘हे’ आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे प्रकार
• प्रतिक्रियाशील मशीन
• मर्यादित मेमरी
• मनाचा सिद्धांत
• स्वत:ची जाणीव
• आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स (ANI)
• कृत्रिम सामान्य बुद्धिमत्ता (AGI)
• आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स (ASI)
कुठे शिकता येईल ऑफलाईन आर्टिफिशियल इंटेलिजन्स?
▪️आयआयएम, कलकत्ता
▪️आयआयआयटी, दिल्ली
▪️आयटीएम व्होकेशनल युनिव्हर्सिटी, वडोदरा
▪️आयआयएससी, बंगलोर
▪️आयआयटी, हैदराबाद
‘हे’ आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे उपयोग
- आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचे होणारे उपयोग अनेक आहेत. आपण रोज वापरणाऱ्या स्मार्टफोन्स मधील ऍप्लिकेशन हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञाना चे उदाहरण आहेत. जसे की, Google Lens, AI Camera, Google Assistant, Alexa, Chat Bots, इत्यादी. आपल्या दैनंदिन जीवनात ह्या सर्व AI तंत्रज्ञानाचा आपण उपयोग करतो.
- तसेच अनेक ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा उपयोग केला जातो. जसं की (Artificial Intelligence) आवाज ओळखण्यासाठी, चेहरा ओळखण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो. तसेच मोबाईल गेम्समध्ये सुद्धा ह्याचा उपयोग केला जातो. जेव्हा आपण एखादा गेम खेळतो तेव्हा त्या गेममध्ये आपल्यासोबत समोरून कॉम्प्युटर खेळतो असे आपल्याला वाटते; पण तो कॉम्प्युटर आपल्याशी खेळत नसून त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर केलेला असतो.
एकूणच काय तर बदलत्या काळात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ हा करिअरचा एक उत्तम पर्याय ठरणार आहे. त्यामुळे नोकरीच्या चिंतेत असणाऱ्या तरुण – तरुणींनी या क्षेत्रातील शिक्षण घेतले तर त्यांच्यासमोर एक ना अनेक करिअरच्या संधी उभ्या राहणार आहेत; हे निश्चित.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com