Army Success Story: कोण आहे कॅप्टन अभिलाषा बराक!! पहा देशाच्या पहिल्या महिला फायटर पायलटचा पराक्रम

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । देशभरातील लष्करी छावण्यांमध्ये बालपण गेल्यामुळे (Army Success Story) सैन्यात सामील होणे हे अभिलाषा बराकसाठी स्वाभाविक होतं. 26 वर्षीय अभिलाषाची भारतीय लष्करात कॉम्बॅट एव्हिएटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर पोचणारी ती पहिली महिला अधिकारी आहे. नाशिक येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये झालेल्या समारंभात कॅप्टन अभिलाषा बराकला लष्करी अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. अभिलाषामुळे देशाला पहिली महिला फायटर पायलट मिळाली आहे. तिच्यामुळं आज पुन्हा एकदा नारी शक्तीचं दर्शन झालं. अभिलाषाने केलेल्या कामगिरीमुळे भारतीय आर्मीच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे. अभिलाषाची कामगिरी तमाम युवा वर्ग आणि महिलांसाठी प्रेरणा देणारी आहे. जाणून घेऊया कॅप्टन अभिलाषाच्या शौर्याविषयी…

घरातूनच सैन्याचं बाळकडू मिळालं –

अभिलाषाला घरातूनच सैन्याचं बाळकडू मिळालं आहे. वडील आणि भावाकडून सैन्य दलात येण्याची प्रेरणा घेणाऱ्या अभिलाषाने आजवरच्या प्रवासात उठावदार कामगिरी केली आहे. हरियाणाच्या रोहतकमध्ये तिचे बालपण गेले. तिचे वडीलही लष्करातून निवृत्त झाले आहेत. तर भाऊ सध्या लष्करात कार्यरत आहे. हिमाचल प्रदेशातील कासूली लॉरेन्स स्कूलची ती विद्यार्थिनी आहे. तिने दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये बी. टेक पदवी घेतली. 2018 मध्ये अभिलाषा चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून लष्करात भरती झाली. या प्रशिक्षणादरम्यान तिला घोडेस्वारी आणि ज्युडोमध्ये मेरिट कार्ड मिळाले. यादरम्यान आर्मी एअर डिफेन्सच्या कॉर्प्समध्ये संलग्न असताना अभिलाषाची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोर होणाऱ्या ‘एएडी’ या प्रतिष्ठित हवाई सादरीकरणासाठी कमांडर म्हणून निवड झाली होती.
तिने आर्मी एअर डिफेन्स यंग ऑफिसर्स कोर्समध्ये ‘ए’ ग्रेडिंग, एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि एअर लॉज कोर्समध्ये 75.70 टक्के मिळवले आणि तिच्या पहिल्याच प्रयत्नात प्रमोशनल परीक्षा, पार्ट बी उत्तीर्ण झाली.

संधीचं सोनं केलं – (Army Success Story)

अभिलाषाने दोनवेळा हवाई दलात भरतीसाठी प्रयत्न केले. तिच्या कमी उंचीमुळे तिला प्रवेश नाकारण्यात आला. पण तिने प्रवेश परीक्षा पस केल्या होत्या. 2018 मध्ये चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीतून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तिची आर्मी एव्हिएशन कोअरमध्ये निवड झाली. फॉर्म भरताना तिला आपण केवळ ग्राउंड ड्युटी रोलसाठी पात्र असल्याची जाणीव होती. मात्र, अर्जात तिने हवाई उड्डाणासाठी अभ्यासक्रमांच्या पात्रतांवरही शिक्का उमटवून या विषयात आवड असल्याचे दर्शविले होते. कठोर मेहनत घेऊन या चालून आलेल्या संधीचं अभिलाषाने सोनं केलं.

काय सांगते कॅप्टन अभिलाषा –

“लष्करी छावण्यांमध्ये वाढताना आणि गणवेशातील लोकांच्या भोवती वावरत असताना सगळ्या गोष्टी रुटीनचा भाग वाटत होत्या. 2011 मध्ये माझे वडील लष्करातून निवृत्त झाले. वडिलांच्या निवृत्तीनंतर आमचे कुटुंब लष्करी जीवनातून बाहेर पडले. तोपर्यंत मला लष्करात जावे असे वाटत नव्हते. पण 2013 मध्ये माझ्या मोठ्या भावाची इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये पासिंग आऊट परेड पाहिल्यानंतर माझ्यातील लष्करात जाण्याची भावना दृढ झाली. मला माझ्या आयुष्यात काय करायचे आहे हे कळले होते,” असे कॅप्टन अभिलाषा सांगते.

Dreams Come True….

“ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई मधून माझे प्रशिक्षण 2018 मध्ये पूर्ण केल्यानंतर, मी आर्मी एव्हिएशन कॉर्प्सची निवड केली. मी फॉर्म भरत असताना, मला माहित होते की मी फक्त ग्राउंड ड्युटीसाठी पात्र आहे परंतु मी पायलट अ‍ॅप्टिट्यूड बॅटरी चाचणी आणि संगणकीकृत पायलट निवड प्रणाली पात्र असल्याचे नमूद केले. (Army Success Story) माझे अंतर्मन मला नेहमी सांगत होते की तो दिवस दूर नाही जेव्हा भारतीय लष्कर महिलांना लढाऊ वैमानिक म्हणून सामील करून घेईल.महिलांना विमान उड्डाण करण्याची परवानगी नव्हती. पण नियम बदलला. जेव्हा महिलांना लष्करात पायलट म्हणून सामावून घेण्याची घोषणा करण्यात आली, तेव्हा आपलं स्वप्न पूर्ण होताना दिसलं. कठोर मेहनत घेऊन ट्रेनिंग दरम्यान आलेल्या सर्व आव्हानांना निर्भीडपणे तोंड दिल्यामुळे मला आजचा दिवस पाहता आला;” असं कॅप्टन अभिलाषा सांगते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com