करिअरनामा ऑनलाईन । साताऱ्यातील सुरेखा यादव या वंदे भारत (Apurva Alatkar) ट्रेन चालवणाऱ्या आशिया खंडातील पहिल्या महिला लोकोपायलट ठरल्या होत्या. त्यांच्यानंतर आता साताऱ्याची कन्या अपूर्वा अलाटकर ही पुणे मेट्रो चालवणारी पहिला महिला ठरली आहे. पुणे मेट्रोचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभारंभ झाला. लोकोपायलट अपूर्वा प्रमोद अलाटकर हिने मेट्रोची ‘मास्क ऑन की’ च्या साथीने सर्व तांत्रिक बाबींच्या मदतीने वनाझ येथून उद्घाटनाची फेरी पूर्ण केली. तीच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे रेल्वे क्षेत्रात साताऱ्याची मान उंचावली आहे.
शाहूपुरीची अपूर्वा
शाहूपुरीतील (सातारा) रांगोळे कॉलनीत अपूर्वा अलाटकर राहते. प्रमोद आणि उज्वला यांची ती कन्या. अपूर्वाचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण बापूसाहेब चिपळूणकर शाळेत झाले. यानंतर तिने आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण अनंत इंग्लिश स्कूलमध्ये पूर्ण केले. दहावीनंतर तिने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण सोलापूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पूर्ण केले. येथील शिक्षण संपवून साताऱ्यात परत आल्यानंतर तिने सज्जनगड येथील ज्ञानश्री इन्स्टिट्यूटमध्ये त्याच शाखेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला पुणे येथील कल्याणी उद्योग समूहात नोकरीची संधी मिळाली. तेथे काम सुरू असतानाच कोरोनाचा कहर वाढला आणि लॉकडाऊन जाहीर झाला. त्यानंतर ती साताऱ्यात परतली.
मेट्रोकडून बोलावणं आलं
2019 मध्ये पुणे मेट्रोसाठीच्या (Pune Metro) विविध पदांसाठीची माहिती तिला मिळाली. त्यानुसार तिने अर्ज केला. अर्ज केल्यानंतर अपूर्वाला पहिल्या फेरीसाठी मेट्रोकडून बोलावण्यात आले. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या फेऱ्या पूर्ण करत फेब्रुवारी 2023 मध्ये अपूर्वाने मेट्रोतील सेवेत आपले स्थान पक्के केले. निवडीनंतर तिच्याकडे वनाझ स्थानकाच्या स्टेशन कंट्रोलर आणि ट्रेन ऑपरेटर अशी दुहेरी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
45 दिवसांचे खडतर प्रशिक्षण
मेट्रोच्या वतीने पुण्यात चार मार्गांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्या मार्गांच्या लोकार्पणाची तयारी प्रशासनाने सुरू केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे ठरल्यानंतर चारही मार्गांवर धावणाऱ्या मेट्रो चालविण्यासाठीचे आवश्यक (Apurva Alatkar) प्रशिक्षण सुरू केले. या प्रशिक्षणार्थीमध्ये अपूर्वाचा देखील समावेश होता. हे 45 दिवसांचे खडतर तांत्रिक प्रशिक्षण तिने पूर्ण केले. “प्रवासी माझ्याशी आदराने वागतात तेव्हा मन खरोखरच आनंदी होते. त्यांनी केलेले कौतुक माझ्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे;” असे पुणे मेट्रो चालक अपूर्वा अलाटकर हिने सांगितले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com