करिअरनामा ऑनलाईन । जागतीक मंदी आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या (Apple Layoffs) संकटाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. प्रत्यक्षात तशा अधिकृत नोंदी दिसत नसल्यातरी याचाच परिणाम म्हणून की काय अनेक बड्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. यामध्ये गुगल, अॅमेझॉन फेसबुकची मदर कंपनी मेटा यांच्यानंतर आता आयफोन बनवणारी कंपनी अॅपलनंही कर्मचारी कपातीला सुरुवात केली आहे. ब्लुमबर्ग न्यूजनं याबाबत वृत्त दिलं आहे.
ब्लुमबर्गच्या अहवालासनुसार, अॅपलच्या कर्मचारी कपातीच्या निर्णयाचा फटका कंपनीच्या डेव्हलपमेंट आणि प्रिझर्व्हेशन टीमला बसणार आहे. पण नेमकी किती कर्मचारी कपात होणार आहे, याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. त्याचबरोबर बिझनेस इनसाईडरने देखील हा (Apple Layoffs) दावा केला आहे की, अॅपलनं कर्मचाऱ्यांना पुन्हा अॅप्लाय करायला सांगितलं आहे अन्य़था त्यांची हाकालपट्टी केली जाईल. या कर्मचारी कपातीचा फटका अॅपलच्या रिटेल स्टोअर्स आणि इतर सुविधा केंद्रांतील कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महागाई वाढल्यानं व्याजाचे दर वाढले आहेत त्यामुळेच जगभरात सध्या आर्थिक मंदीची स्थिती असल्याच्या बातम्या यापूर्वीच आल्या आहेत. याचा फटका अनेक (Apple Layoffs) बड्या टेक कंपन्यांना बसला आहे. यामध्ये फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटानं दोन टप्प्यात कर्मचारी कपात केली. पहिल्या टप्प्यात 11 हजार त्यानंतर त्यानंतर 10 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकलं होतं.
तसेच गुगलने गेल्यावर्षी आपल्या 12 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकलं होतं. कंपनीची आर्थिक परिस्थिती अधिक बिकट होण्यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीनं (Apple Layoffs) म्हटलं आहे. त्याचबरोबर अॅमेझॉननं 27 हजार कर्मचाऱ्यांची दोन टप्प्यात कपात केली होती. पहिल्या टप्प्यात 18 हजार कर्मचारी तर दुसऱ्या टप्प्यात 9 हजारकर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली होती.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com