Apple Career : Appleचा भारतात झगमगाट!! कर्मचाऱ्यांना मिळतं ‘इतकं’ पॅकेज; त्यांचं शिक्षण ऐकून व्हाल थक्क!!

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । मोबाईल जगातील सर्वात मौल्यवान (Apple Career) कंपनी Apple ने नुकतेच भारतात त्यांचे 2 नवीन स्टोअर उघडले आहेत त्यामुळे ही कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 2025 पर्यंत प्रत्येक 100 पैकी 25 आयफोन भारतात बनवले जातील; असं या कंपनीचं उद्दिष्टय आहे. अशा परिस्थितीत आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला Apple स्टोअरच्या कर्मचाऱ्यांचा पगार किती आहे आणि त्यांचे शिक्षण काय आहे हे सांगणार आहोत. यासोबतच देशात अॅपलचे स्टोअर कुठे सुरू आहेत आणि त्यासाठी किती भाडे द्यावे लागेल हे देखील सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेवूया भारतात सुरु झालेल्या Apple स्टोअरविषयी…

 

Apple Career

इतकं मिळतं वार्षिक पॅकेज
Apple ज्या पद्धतीने महागडे आयफोन बनवते आणि विकते त्याचप्रकारे, ही कंपनी तिच्या कर्मचार्‍यांना मोठा मोबदला देते. कंपनीने आपल्या कोणत्याही कर्मचार्‍यांच्या पगाराचा (Apple Career) खुलासा केलेला नसला तरी, मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनी भारतातील स्टोअरमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना दरमहा किमान 1 लाख रुपये पगार देते. म्हणजेच जवळपास सर्व कर्मचाऱ्यांना किमान 12 लाखांचे वार्षिक पॅकेज मिळते. विशेष म्हणजे तंत्रज्ञानासोबतच या कर्मचाऱ्यांचे अनेक भाषांवरही प्रभुत्व आहे.

Apple Career

एवढं आहे कर्मचाऱ्यांचं शिक्षण (Apple Career)
अॅपलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पात्रताही खूप जास्त आहे. या कर्मचाऱ्यांकडे एमबीए, एमटेक, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, बीटेक, रोबोटिक्स अशा पदव्या आहेत. यातील अनेक कर्मचारी असे आहेत ज्यांनी परदेशी विद्यापीठांमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅपल स्टोअरमध्ये काम करणार्‍या बहुतेक कर्मचाऱ्यांना 15 पेक्षा जास्त भाषा येतात.

Apple Career

भारतात दोन सेंटर्स सुरु
अलीकडेच देशात मुंबई आणि दिल्ली (Apple Career) येथे अॅपलचे दोन स्टोअर सुरू झाले आहेत. मुंबईचे अॅपल स्टोअर जिओ वर्ल्ड मॉलमध्ये तर दिल्लीचे साकेतमध्ये उघडले आहे. मुंबईतील स्टोअरचे भाडे 42 लाख रुपये आहे आणि दिल्लीतील स्टोअरचे भाडे 40 लाख रुपये दरमहा आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com