करिअरनामा ऑनलाईन । महिला उमेदवारांसाठी (Anganwadi Bharti 2024) राज्य शासनाने मोठी भरती जाहीर केली आहे. ज्या महिलांना अंगणवाडीची मदतनीस म्हणून काम करायचे आहे त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आहे. राज्य शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा या योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण आदिवासी नागरी प्रकल्पातील एकूण 14 हजार 690 अंगणवाडी मदतनीसांच्या रिक्त जागा निर्माण झाल्या आहेत. या जागा भरण्यासाठी आता अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. ही एक मोठी संधी आहे. या भरतीसाठी इच्छुक महिला उमेदवारांनी अजिबात उशीर न करता लवकरात लवकर अर्ज सादर करावा; असं आवाहन करण्यात आलं आहे.
या जागा महिला आणि बाल विकास विभागाच्या निर्देशनानुसार भरल्या जाणार आहेत; अशी माहिती एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी दिली आहे. या रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस जागा 31 ऑगस्टपर्यंत भरल्या जाणार आहेत.
काय आहे आवश्यक पात्रता (Anganwadi Bharti 2024) –
1. अंगणवाडी मदतनीस पदाचा अर्ज करण्यासाठी महिला 12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
2. उमेदवारांची वय मर्यादा 18 ते 35 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.
3. विधवा महिलांच्या बाबत कमाल मर्यादा ही 40 वर्षे ठेवण्यात आली आहे.
4. महिला उमेदवारांनी दि. 31 ऑगस्टपर्यंत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन अर्ज सादर करायचा आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत (Anganwadi Bharti 2024) राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत तसेच ग्रामीण आदिवासी प्रकल्पांतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी मदतनीसांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. केंद्रांमध्ये 783 अंगणवाडी मदतनीस पदे तर राज्यात 14,690 अंगणवाडी मदतनीस पदे रिक्त आहेत.
या भरती बाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली (Anganwadi Bharti 2024) जाणार आहे. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत? अर्ज कधी सुरू होणार, अर्ज पद्धत काय असणार आहे भरतीची प्रक्रिया काय असणार ही संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला शासनाकडून जाहिरात प्रकाशित केल्यानंतर मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com