करिअरनामा ऑनलाईन । नुकताच नाशिक जिल्ह्यातील (Anganwadi Bharti 2023) इगतपुरी येथे ‘राष्ट्रीय पोषण माह’ राज्यस्तरीय अभियानाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याला महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील प्रत्येक अंगणवाडीसाठी इमारत उपलब्ध केली जाईल तसेच 17 हजार पेक्षा अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती करण्यात येईल; अशी मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे अंगणवाडी मध्ये काम करू इच्छिणाऱ्या महिलांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
यावेळी बोलताना मंत्री आदिती तटकरे पुढे म्हणाल्या; “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये ० ते ६ वयोगटाच्या बालकांसाठी सुपोषीत भारताची संकल्पना (Anganwadi Bharti 2023) मांडली आहे. महाराष्ट्र राज्य हे पोषण माह उपक्रमात देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. याचे सर्व श्रेय अंगणवाडी शिक्षक आणि सेविकांना जाते. सुपोषीत भारत अंतर्गत राबविलेल्या विविध उपक्रमात नाशिक जिल्हा राज्यात अग्रेसर आहे.
राष्ट्रीय पोषण माह राज्यस्तरीय अभियानाच्या उद्घाटनासाठी राज्याचे महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांच्यासह आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, बालविकास विभागाचे (Anganwadi Bharti 2023) अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण माह अभियानाचे महत्त्व समजून सांगण्यात आले. तसेच यासाठी कोणत्या बाबी गरजेच्या आहेत हे देखील पटवून देण्यात आले. अंगणवाडी सेविका व मतदनीस यांच्या कुटूंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात येईल अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. त्याचबरोबर, राष्ट्रीय पोषण अभियानात अधिकाधिक उपक्रम राबवून महाराष्ट्र राज्याचा देशात पहिला क्रमांक आणण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करूया असे आवाहन तटकरे यांनी केले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com