Asian Games 2023 : उधारीच्या रायफलवर केला सराव; पठ्ठ्यानं मैदान मारलं अन् आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकलं गोल्ड मेडल

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । उत्तर प्रदेशच्याबागपत शहरातील (Asian Games 2023) नेमबाज अखिल शेओरानने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. या स्पर्धेत अखिलने विश्वविक्रम मोडत सुवर्णपदक जिंकले आहे. बागपत जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय नेमबाज अखिल शेओरानने चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत विश्वविक्रम मोडून सुवर्णपदक जिंकले आहे.
बिनौलीच्या अंगदपूर गावातील शेतकरी बबलू शेओरान यांचा मुलगा अखिल शेओरान याने भारतीय पुरुषांच्या ५० मीटर थ्री पोझिशन रायफल सांघिक स्पर्धेत ऐश्वर्या तोमर, स्वप्नील कुसळे यांच्यासह १७६९ च्या विक्रमी गुणांसह सुवर्णपदक जिंकले आहे. याआधीही अखिल शेओरानने अझरबैजान येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदक आणि सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावून ऑलिम्पिक कोटा गाठला होता.

अखिलने पदक जिंकल्याबद्दल डॉ. राजपाल सिंग, उत्तर रेल्वेचे प्रशिक्षक विपिन राणा, विवेक अत्रेय, प्रशिक्षक बिट्टू खान, वाजिद अली, खेलो इंडियाचे प्रशिक्षक मेहबूब पठाण, सचिन कौशिक, संजीव तोमर आदी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
उधारीच्या रायफलवर केला सराव (Asian Games 2023)
आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या अंगदपूर गावातील अखिल शेओरानने उधार घेतलेली रायफल घेऊन सरावाला सुरुवात केली. त्यामुळेच सुरुवातीला अखिलची चाचणी चुकली आणि नंतर शेतकरी वडील रवींद्र शेओरान यांनी कर्ज काढून आपल्या मुलासाठी रायफल आणली. यानंतर अखिलने सुवर्ण पदकासह इतर पदकांची लयलूट केली.

वडिलांनी रायफलसाठी कर्ज घेतले
मेरठच्या गॉडविन स्कूलमध्ये शिकत असताना अखिल शेओरानने रायफलचा सराव सुरू केला. त्याच्यासोबत शिकणारा
दुसरा विद्यार्थीही याच रायफलने सराव करत असे. अखिलने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर झालेल्या आंतरशालेय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.दरम्यान पुढील स्पर्धेसाठी पथकाची ट्रायल होणार होती आणि एकच रायफल असल्याने तो ट्रायल देऊ शकला नाही.
अखिलच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. त्याचे वडील केवळ दोन हेक्‍टर शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तुटपुंज्या उत्पन्नामुळे त्याच्या वडिलांना रायफल (Asian Games 2023) खरेदी करणं शक्य नव्हतं. पण त्यांना मुलाचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. यासाठी त्यांनी 85 हजार रुपयांचे कर्ज घेतले आणि शेतीतून मिळालेल्या उत्पन्नाचे 80 हजार अशी रक्कम गोळा करुन त्यांनी मुलाला रायफल घेवून दिली. यांनातर अखिलने मागे वळून पाहिले नाही. त्याच्या अविरत सरावासोबत पदके जिंकण्याचे सातत्य सुरुच राहिले.

अखिल शेओरानने 2014 साली ISSF जागतिक नेमबाजी चॅम्पियनशिप स्पेनमध्ये ब्राँझ मेडल, 2015 साली ज्युनियर॒विश्‍वचषक जर्मनीमध्ये ब्राँझ मेडल, कुवेत आशियाई नेमबाजी स्पर्धेत एक गोल्ड मेडल, तीन सिल्व्हर मेडल आणि एअरगन नेमबाजी स्पर्धेत दिल्लीत एक सिल्व्हर मेडल पटकावले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com