करिअरनामा ऑनलाईन । अकासा एअरने (Akasa Air) सुमारे 1 हजार लोकांची (Akasa Air Recruitment) भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मार्च 2024 च्या अखेरीस एकूण कर्मचारी संख्या 3 हजारांवर नेण्याची योजना आखली आहे. अकासा एअरलाइनने मार्गांचा विस्तार सुरू ठेवला आहे, असे अकासा एअरचे संस्थापक आणि सीईओ विनय दुबे यांनी म्हटले आहे. 7 महिन्यांपूर्वी या एअरलाइनने विमान वाहतूक सुरु केली होती. या वर्षाच्या अखेरीस अकासा एअरने आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्स सुरू करण्याची योजना आखली आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अकासा एअरचे संस्थापक आणि सीईओ दुबे यांनी सांगितले की, एअरलाइन या वर्षाच्या अखेरीस तीन अंकी विमानांची (Akasa Air Recruitment) ऑर्डर देईल. 72 बोईंग आणि 737 मॅक्स विमानांची ऑर्डर दिली आहे आणि त्यापैकी 19 विमाने आधीच त्यांच्या ताफ्यात सामील झाली आहेत. 20 वे विमान एप्रिलमध्ये अकासा एअरमध्ये सामील होईल. त्यानंतर ते परदेशात उड्डाण करण्यासदेखील पात्र असेल.
पुढील आर्थिक वर्षात अकासा एअरने आपल्या ताफ्यात आणखी 9 विमाने सामील करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे एकूण विमानांची संख्या 28 वर जाईल. अकासा एअर दररोज 110 उड्डाणे चालवते. “आमच्याकडे सध्या 2 हजारपेक्षा जास्त कर्मचारी आहेत आणि पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस (Akasa Air Recruitment) आमच्याकडे सुमारे ३ हजारपेक्षा जास्त कर्मचारी असतील. त्यात 1,100 वैमानिक आणि फ्लाइट अटेंडंट्सचा समावेश असेल,” असे दुबे यांनी दिल्लीतील एका मुलाखतीत सांगितले.
“सध्या दिवसाला ११० उड्डाणे होत आहेत आणि उन्हाळा संपेपर्यंत आम्ही दररोज 150 उड्डाणे करू. यात सतत वाढ होत राहील,” असेही ते म्हणाले. अधिकृत आकडेवारीनुसार, फेब्रुवारीमध्ये अकासा एअरमधून ३.६१ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.
केबीन क्रू साठी मिळणारा पगार (Akasa Air Recruitment)
Average Akasa Air Cabin Crew salary in India is ₹ 5.7 Lakhs for less than 1 year of experience to 10 years Cabin Crew salary at Akasa Air India ranges between ₹ 3.1 Lakhs to ₹ 11.0 Lakhs. According to our estimates it is 5% less than the average Cabin Crew Salary in India.
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचे प्रत्येक सत्र सुमारे 45 मिनिटे चालते आणि त्यात सुमारे 10-15 मिनिटे परिचय देण्यासाठी आणि प्रश्नांसाठी 5 मिनिटे असतात.
केबिन क्रूसाठी वय मर्यादा –
फ्रेशर्ससाठी 18 वर्षे ते 28 वर्षे
अनुभवी उमेदवारांसाठी 35 वर्षे (Akasa Air Recruitment)
इतर पात्रता –
किमान उंची – महिलांसाठी 155 सेमी
पुरुषांसाठी 167.5 सेमी (आणि प्रमाणानुसार वजन).
(टिप : उमेदवाराकडे वैध पासपोर्ट, पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणे आवश्यक.)
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com