Air India Recruitment 2024 : Air India च्या 600 पदांसाठी 25 हजार तरुण रांगेत; मुंबई विमानतळावर गोंधळ आणि चेंगराचेंगरी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस (Air India Recruitment 2024) गंभीर बनत चालली आहे. भारतात अनेक दशकांपासून बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. पण अजूनही देशातील बेरोजगारी मिटली नाही. याचं ताजं उदाहरण आज मुंबईत पाहायल मिळालं. एअर इंडियाने (Air India) भरती जाहीर केली होती. 600 जागांसाठी जाहिरात काढण्यात आली. या 600 जागांसाठी मुलाखत द्यायला तब्बल 25 हजार तरुणांनी गर्दी केली. या गर्दीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. एअर इंडियातर्फे एअरपोर्ट लोडर पदासाठी (Airport Loader) भरती काढण्यात आली होती. पण 600 जागांसाठी 25 हजाराहून अधिक बेरोजगरांनी गर्दी केल्याने मुंबई विमानतळावर एकच तारांबळ उडाली. एअर इंडिया कर्मचाऱ्यांना गर्दी सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागली.

कोणत्या पदासाठी निघाली भरती?
एअर इंडियात ‘लोडर’ पदासाठी ही भरती करण्यात येत आहे. या नोकरीत विमानातून सामान उतरवण्याचं आणि चढवण्याचं काम असतं. प्रत्येक विमानातील सामान, कार्गो आणि इतर (Air India Recruitment 2024) सामान उतरवण्यासाठी किंवा चढवण्यासाठी 5 ते 6 लोडर असतात. लोडरचा दरमहा पगार 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत असतो. ओव्हरटाईम केल्यास पगार 30 हजारांपर्यंत जातो. लोडर पदासाठी शिक्षणाची अट 10 वी पास असते पण उमेदवार शरीराने तंदरुस्त असायला हवा अशीही अट असते.

उमेदवारांची एकमेकांना धक्काबुक्की (Air India Recruitment 2024)
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबई विमानतळावरची ही दृश्ये देशातील बेरोजगारीची भीषणता दाखवण्यासाठी पुरेशी असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. यावरुन आता राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत मुंबई विमानतळावर तरुणांची तुफान गर्दी दिसतेय. आपला नोकरीचा अर्ज काऊंटरपर्यंत पोहोचवण्यासाठी हजारोंच्या संख्यने आलेले तरुण एकमेकांना धक्काबुक्की करताना दिसत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com