करिअरनामा ऑनलाईन । एअर इंडियामध्ये नोकरी करु इच्छिणाऱ्या (Air India) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एअर इंडिया यंदा 9000 वैमानिक आणि 4,200 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सेवेचा विस्तार करण्याची योजना आखली असून त्याचाच भाग म्हणून ही भरती केली जाणार आहे.
वैमानिकांबरोबरच देखभाल अभियंत्यांचीही मोठय़ा प्रमाणात भरती केली जाणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे, करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच एअर इंडियाने बोईंग आणि एअरबस या कंपन्यांकडून 70 मोठय़ा विमानांसह 470 विमाने खरेदी करण्याचे जाहीर केले होते. त्याशिवाय 36 विमाने (Air India) भाडय़ाने घेतली जाणार आहेत. त्यापैकी दोन ‘777-200 एलआर’ विमाने एअर इंडियाच्या ताफ्यात दाखलही झाली आहेत. टाटा समूहाने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये तोटय़ातील एअर इंडिया 18 हजार कोटींना खरेदी केली होती. त्यानंतर कंपनीने आपला आकार आणि सेवा या दोन्हींचा विस्तार करण्याची योजना आखली. त्याअंतर्गत मे-2022 ते फेब्रुवारी 2023 या काळात एअर इंडियाने 1,900 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती केली आणि 1,100 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले, अशी माहिती कंपनीतर्फे देण्यात आली. टॅलेंटेड युवकांना संधी दिल्याने एअर इंडियाच्या सांस्कृतिक परिवर्तनाचा वेग वाढेल, असे कंपनीने म्हटले आहे.
प्रशिक्षणात काय शिकाल (Air India)
एअर इंडियामध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना 15 आठवडय़ांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यामध्ये त्यांना सुरक्षा आणि सेवा कौशल्ये शिकवली जातील. तसेच त्यांना भारतीय आदरातिथ्य आणि टाटा समूहाची संस्कृती यांचा सर्वोत्तम मिलाफ घडवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली.
हजारो पायलट्सची गरज
‘एअर इंडिया’ आणि ‘विस्तारा’ तसेच ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ आणि ‘एअरएशिया इंडिया’च्या विलीनीकरणानंतर एअर इंडिया समूहाला आपल्या विस्तारित विमान ताफ्यासाठी (Air India) हजारो वैमानिकांची आवश्यकता आहे. काही वृत्तांनुसार कंपनीला 6500 हून अधिक वैमानिकांची आवश्यकता असल्याचे म्हटले जाते.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com