करिअरनामा ऑनलाईन । आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये (AI Estimate) दररोज नवीन विकास होताना दिसत आहे. AI अनेक क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाद्वारे मानवाची जागा घेवू शकते. AI तंत्रज्ञान लवकरच बर्याच नोकऱ्यांसाठी धोका बनू शकते विशेषत: जेव्हा हे तंत्रज्ञान कंटेंट रायटींग आणि शिक्षण व्यवसायात शिरकाव करेल तेव्हा.
गोल्डमैन सैक्स (Goldman Sachs) च्या अर्थशास्त्रज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार ChatGPT सारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता असणाऱ्या प्लॅटफॉर्मद्वारे जगभरात 300 दशलक्षाहून (AI Estimate) अधिक पूर्णवेळ नोकर्या स्वयंचलित (Automatic) केल्या जाऊ शकतात. 2023 पर्यंत जगभरात 300 दशलक्ष नोकऱ्या अशा आहेत ज्यामध्ये जागतिक कर्मचार्यांपैकी 18 टक्क्यांहून अधिक त्यांचा वाटा आहे.
या नोकऱ्यांना अधिक धोका (AI Estimate)
1. कोडिंग आणि संगणक अभियांत्रिकी सारख्या टेक क्षेत्रातील नोकऱ्या
2. पत्रकारिता, जाहिरात आणि सामग्री लेखन यासारख्या मीडिया क्षेत्रातील नोकऱ्या
3. पॅरालीगल आणि लॉ असिस्टंट सारख्या कायदेशीर नोकऱ्या
4. मार्केट रिसर्च अॅनालिस्ट नोकर्या
5. वित्त आणि व्यापार नोकऱ्या
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com