करिअरनामा ऑनलाईन । AI तंत्रज्ञान सध्या करिअरची नवी (AI Courses) संधी म्हणून उदयास येत आहे. म्हणूनच मायक्रोसॉफ्टकडून नवे AI कोर्सेस सुरु करण्यात आले आहेत. ज्या व्यक्तींना नोकरीसाठी कौशल्य आणि कलात्मक गुणांची गरज आहे त्यांच्यासाठी मायक्रोसॉफ्टने नवे AI कोर्सेस सुरू केले आहेत. हा कोर्स 12 आठवड्यांचा असेल. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. विद्यार्थी तसेच नवोदित तरुण सर्वांनाच या तंत्रज्ञानाचा लाभ घेता येणार आहे.
असे आहेत मायक्रोसॉफ्टचे कोर्सेस (AI Courses)
– मायक्रोसॉफ्टने 12 आठड्यांसाठी 24 वेगवेगळ्या विषयांचा अभ्यासक्रम सुरु केला आहे.
– हे कोर्सेस मोफत आहेत.
– विविध AI संकल्पनांना परिचय करून देण्यासाठी मदत होणार आहे.
– AI आणि मशीन लर्निंग यातला फरक, त्यांचा उपयोग यासारख्या अभ्यासक्रमांचा कोर्सेसमध्ये समावेश.
– AI क्षेत्रातील (AI Courses) अभ्यासक्रमांविषयी देखील प्रशिक्षण देणार.
– जनरेटिव्ह AI समजून घेण्यासाठी आणि त्याचा वापर कसा करावा, हे समजून घेण्यासाठी या कोर्सेसची सुरूवात करण्यात आली आहे.
– या कोर्सेसची माहिती मायक्रोसॉफ्ट क्लाउडवरुन घेता येईल. सध्या अनेक अभ्यासक्रमांमध्ये डेटा सायन्स, मशीन लर्गिंग, AI आणि अॅनालिटीक्स विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com