Agriculture Degree Admission : कृषी पदवीच्‍या नोंदणीसाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार नोंदणी; पहा वेळापत्रक

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कृषी शाखेतील विविध पदवी (Agriculture Degree Admission) अभ्यासक्रमांच्‍या नोंदणीसाठी रविवार दि. 9 जुलै पर्यंत असलेली अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आता विद्यार्थ्यांना 16 जुलैपर्यंत नोंदणी करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. तर पहिली वाटप यादी दि. 29 जुलैला प्रसिद्ध केली जाणार आहे.
विज्ञान शाखेतून इयत्ता बारावी उत्तीर्ण व एमएचटी-सीईटी किंवा, जेईई, नीट या प्रवेश परीक्षा दिलेल्‍या विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या या परीक्षांतील कामगिरीच्‍या आधारे कृषी (Agriculture Degree Admission) शाखेतील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी नोंदणी करण्याची संधी उपलब्‍ध आहे.

10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदविका (डिप्‍लोमा) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे. राहुरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठातर्फे डिप्‍लोमा अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरु आहे.
पदवी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक असे आहे – (Agriculture Degree Admission)
1. नोंदणीसाठी वाढीव मुदत – दि. 16 जुलै
2. अंतरिम गुणवत्ता यादी प्रसिद्धी – दि. 20 जुलै
3. ऑनलाईन तक्रार नोंदणी – दि. 21 ते 23 जुलै
4. अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्धी – दि. 27 जुलै
5. पहिल्‍या फेरीची वाटप यादी – दि. 29 जुलै
6. प्रवेश निश्‍चितीची मुदत – दि. 30 जुलै ते 1 ऑगस्‍ट
7. दुसऱ्या फेरीची वाटप यादी – दि. 3 ऑगस्‍ट
8. प्रवेश निश्‍चितीची मुदत – दि. 4 ते 6 ऑगस्‍ट
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com