Agriculture Courses After 12th : कृषी क्षेत्रात शिक्षण घेऊन करा करिअर; लाखात मिळणार पगार!! जाणून घ्या ‘या’ खास अभ्यासक्रमांबद्दल

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आधुनिकीकरणाच्या या (Agriculture Courses After 12th) युगात जास्तीत जास्त तरुण कृषी क्षेत्राकडे वळत आहेत. आधुनिक शेती तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवीन संधी उपलब्ध करुन देत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने शेतीमध्ये नवनवीन कल्पना जन्माला आल्या आहेत आणि त्याबरोबर अधिक प्रमाणात तरुणांचा कल शेतीकडे वळला आहे. आजकाल कृषी विषयातील अनेक अभ्यासक्रम टॉप ट्रेंडमध्ये आहेत. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून तरुणांना शेतीशी संबंधित उत्तम माहिती मिळणार आहे. ज्याच्या जोरावर तरुणांना नवीन क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळणार आहे. या क्षेत्रात तरुणांना लाखो नोकऱ्या सहज मिळू शकतात; याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत….

शेतीमधील करिअरमधून होईल लाखोंची कमाई
वैज्ञानिक शेतीमुळे देशातील शेतकरी स्वावलंबी होत आहेत. आधुनिक पद्धतीची शेती उत्पादनात वाढ करत असतानाच जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठीही प्रभावी ठरत आहे. त्यामुळेच आता शेतकरी आपल्या शेतातील मातीची चाचणी करून खतांचे प्रमाण ठरवू शकतात. अशा (Agriculture Courses After 12th) परिस्थितीत कृषी, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, वनीकरण, फलोत्पादन, अन्न आणि गृहविज्ञान यासारख्या क्षेत्रांमध्ये अभ्यास करून तुम्ही तुमचे भविष्य आजमावू शकता. कृषी क्षेत्रात मार्केटिंग आणि मॅनेजमेंट क्षेत्रातही अप्रतिम करिअर करता येते.

कृषी क्षेत्रात करिअर करण्यासाठी हे आहेत विशेष अभ्यासक्रम
1. कृषी भौतिकशास्त्र
2. शेती व्यवसाय
3. वनस्पती पॅथॉलॉजी
4. वनस्पती प्रजनन आणि आनुवंशिकी
5. वृक्षारोपण व्यवस्थापन

पात्रता आणि प्रवेश प्रक्रिया (Agriculture Courses After 12th)
या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी तुम्ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा जीवशास्त्र या विषयांसह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कृषी शास्त्रज्ञ होण्यासाठी B.E. किंवा कृषी पदविका करणे आवश्यक आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्याकडे संबंधित विषयात स्पेशलायझेशन असावे.

कृषी क्षेत्रात नोकरीच्या संधी
देशातील तरुणांना दरवर्षी ICAR (भारतीय कृषी संशोधन परिषद) मध्ये नोकरीची संधी मिळते. UPSC मार्फत कृषी तज्ञांच्या नियुक्तीसाठी परीक्षा देखील घेतली जाते. अनेक खासगी कंपन्या कृषी पदवीधरांना नोकऱ्याही देतात. हे पदवीधर शेतकर्‍यांना बँकेतील किसान क्रेडिट कार्ड, कर्ज आदी (Agriculture Courses After 12th) कामात मदत करू शकतात. बँकेच्या फिल्ड ऑफिसरच्या नोकरीसाठी कृषी क्षेत्रातील अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाते.

इथे करा कोर्स
1. भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली
2. भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था
3. राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था
4. इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ
5. अलाहाबाद कृषी संस्था
6. जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठ
7. भारतीय कृषी संशोधन संस्था
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com