करिअरनामा ऑनलाईन। चंद्रपूरसारख्या अति उष्ण भागात अनेकदा शेतीवर प्रयोग केले जात नाही आणि (Agricultural Success Story) ताडोबा सोडलं तर इथे पर्यटनासाठी फार काही उपलब्ध नाही त्यामुळे हा नवा प्रयोग आम्ही केला आणि आज तो यशस्वी होतोय, असं ‘एक मोकळा श्वास’चे संचालक सुहास आसेकर सांगत होते. नव्या पीढीला शेती आणि त्याबाबतची माहिती मिळावी तसेच, गावाकडचं वातावरण, खेळ आणि तिथले अनुभव सध्याच्या तरुणांना तसेच शहरी नागरिकांना मिळावं यासाठी ‘मोकळा श्वास’ची उभारणी करण्यात आली आहे. चार मित्रांनी उभारलेलं हे कृषी पर्यटन केंद्र आता चांगलंच नावा रुपाला आलंय. पाहूया या फोर इडियट्सची आयडिया कशी कामी आली…
‘एक मोकळा श्वास’
चंद्रपूर जिल्ह्यातील राजूऱ्याजळव ‘एक मोकळा श्वास’ हे कृषी पर्यटन केंद्र आहे. पर्यटनाची आवड आणि विविध क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असलेल्या चार जवळच्या मित्रांनी एकत्र येत 2016 मध्ये हा प्रयोग केला. चंद्रपूरातील अनेक भाग ओसाड आहेत. अनेक लोक कामानिमित्त वेगवेगळ्या शहरांमध्ये स्थायिक झाले आहेत. मात्र गावाची ओढ प्रत्येकाला आहे. त्यामुळे शेती , मातीशी नाळ जोडून रहावी आणि ग्रामीण संस्कृती जपता यावी, यासाठी या चार मित्रांनी पुढाकार घेतला.
25 वर्ष ओस पडली होती जमीन (Agricultural Success Story)
रिंकू मरसकोल्हे, सुहास आसेकर, नितिन मुसळे, रुपेश शिवणकर या चार मित्रांनी मिळून हा प्रयोग केला आहे. चारही मित्रांना पर्यटनाची प्रचंड आवड असल्याने प्रत्येकवेळी नव्या ठिकाणाला भेट देऊन काय नवं करता येईल याचा विचार त्यांनी केला. त्यावेळी चंद्रपूरसारख्या शहरात नवा प्रयोग यशस्वी होणार का? कृषी पर्यटन लोक चंद्रपूरमध्ये का करतील? असे अनेक प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर होते. कृषी पर्यटनासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे जमिन. यांच्यातल्या एकाकडे गेली 25 वर्ष ओसाड पडलेली 9 एकर जागा होती. त्या जागेवर 25 वर्ष शेती किंवा नांगर फिरला नव्हता. 9 एकर शेतजमिनीला जंगलाचं रुप आलं होतं. या जमिनीचा योग्य वापर करुन त्यांनी शहरात राहून गावात हा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. झाडांच्या लागवडीपासून तर मशागत करण्यापर्यंत या चार मित्रांनी मेहनत घेतली.
घ्या ग्रामीण संस्कृतीचं दर्शन अन् चाखा अस्सल गावरान चव
एक मोकळा श्वास या कृषी पर्यटन केंद्रावर जाताच तुमचं हळद कुंकु लावून स्वागत केलं जातं. तुमचा यथेच्छ पाहूणचार केला जातो. त्यानंतर ग्रामीण रानमेवा, तर्री पोहे, पिठलं- भाकरी आणि त्यासोबत लहापणी शाळेच्या बाहेर असताना खाल्लेले अनेक पदार्थ उदा. बोरं, पेरु दिले जातात. ग्रामीण भागात जे खेळ खेळले जातात त्यापैकी अनेक खेळ या ठिकाणी खेळायला मिळतात. शेततळं, लगोरी, गोट्या, कंचे, रस्सी खेच, सायकल या सगळ्या खेळांचा अनुभव इथे आलेल्या प्रत्येक पर्यटकाला घेता येतो.
इतका आहे टर्न ओव्हर
हे कृषी पर्यटन केंद्र ज्या जमिनीवर उभारलं आहे ती जमीन तब्ब्ल २५ वर्षं ओस पडली होती. या जमिनीवर अक्षरशः जंगल तयार झालं होतं. कृषि पर्यटन केंद्र सुरु करण्यापूर्वी या 9 एकर ओसाड (Agricultural Success Story) जमिनीवर खूप मेहनत घ्यावी लागली आहे. जमिनीची मशागत, वृक्षारोपण करून या ओसाड जमिनीला नवं चैतन्य देण्यात या चारही मित्रांनी दिवस रात्र घाम गाळला आहे. अखेर 2016 मध्ये हे कृषी पर्यटन केंद्र सुरु झालं आहे. पहिल्यावर्षी मक्याची शेती, इतर झाडांची लागवड, केंद्रासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचा विचार करता टर्नओव्हर 4 लाखांचा होता मात्र दुसरे लॉकडाऊन संपल्यानंतर याच कृषि पर्यटन केंद्राचा टर्न ओव्हर तब्बल 43 लाखाच्या घरात पोहचला आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com