Agniveer Recruitment : 22 नोव्हेंबरपासून कोल्हापूरात अग्निवीर भरती, 98 हजार तरुण देणार परीक्षा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। कोल्हापुरात अग्निवीर सैन्य भरतीची (Agniveer Recruitment) प्रक्रिया येत्या 22 तारखेपासून सुरू होणार आहे. 11 डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या भरतीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर या भरतीची तयारी सुरू असून साधारण 98 हजार तरुणांनी भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे. अग्नीवीर योजनेच्या विरोधात देशभर आंदोलने झाली असली तरी मैदानावरचे चित्र वेगळे पाहायला मिळतंय. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, बेळगाव आणि गोवा इथले तरुण या भरतीमध्ये सहभागी होणार आहेत. एकाच वेळी तरुणांची गर्दी होऊ नये यासाठी दररोज 5000 तरुणांना भरतीसाठी बोलवले जाणार आहे.

प्रशासनाकडून जय्यत तयारी (Agniveer Recruitment)

कोल्हापूरमध्ये 22 नोव्हेंबरपासून होणाऱ्या अग्निवीर भरतीसाठी 98,000 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. या भरतीसाठी यापूर्वीच ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या भरतीसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे उमेदवारांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.

भरतीला येणाऱ्या उमेदवारांना राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावर एकत्र करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येकी 200 किंवा सैन्य दलाकडून मागणी होईल त्याप्रमाणे उमेदवारांना (Agniveer Recruitment) शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सोडण्यात येईल. त्याठिकाणी या उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या होतील.

उमेदवार एक दिवस आधीच कोल्हापूरमध्ये येण्याची शक्यता गृहित धरून सोयीसुविधांची पाहणी महापालिका, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. उमेदवारांना पाणी, शौचालय यांची व्यवस्था व्हावी यासाठी प्रशासनाने या परिसराची पाहणी केली.

अशी होणार भरती

भरतीची ही प्रक्रिया टेंबलाई टेकडी येथील मराठा लाईफ इन्फट्रीच्या मैदानावर होणार आहे. पहिल्या टप्प्यात अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे वजन, उंची याची तपासणी होणार आहे. (Agniveer Recruitment)

त्यानंतर धावणे, लांब उडी यासारख्या शारीरिक चाचण्या होतील. किमान महिनाभर ही प्रक्रिया सुरू राहील.

अग्निपथ योजनेंतर्गत, उमेदवारांना 4 वर्षांसाठी भरती केले जाईल.

यामध्ये अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर टेक्निकल (एव्हिएशन/म्युनिशन एक्झामिनर), अग्निवीर क्लर्क/स्टोअर कीपर, टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन जनरल (8 वी पास) आणि अग्निवीर ट्रेड्समन टेक्निकल या पदांचा समावेश आहे.

भरतीचे तीन टप्पे

उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि सामायिक प्रवेश परीक्षा (लेखी परीक्षा) द्यावी लागेल.

  1. शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना 15 जानेवारी 2023 रोजी होणारी सामायिक लेखी परीक्षा (सीईई)द्यावी लागेल.
  2. अंतिम गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांना देशसेवेसाठी अग्निवीर म्हणून भारतीय लष्करात भर्ती होण्याबाबतचे पत्र देण्यात येईल. (Agniveer Recruitment)
  3. मेळाव्याच्या ठिकाणी येताना उमेदवारांनी मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे, पुरेशा प्रमाणात छायाचित्रे, प्रारुपात नमूद केल्यानुसार वैध प्रतिज्ञापत्र, रहिवासाचे प्रमाणपत्र तसेच जात प्रमाणपत्र यांसारखी सर्व कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

इतका मिळेल पगार –

प्रथम वर्ष- 30,000 रुपये (+लागू भत्ते)

द्वितीय वर्ष- 33,000 रुपये (+लागू भत्ते)

तिसरे वर्ष- 36,500 रुपये (+लागू भत्ते) (Agniveer Recruitment)

चौथे वर्ष- 40,000 रुपये (+लागू भत्ते)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com