Agniveer Recruitment : मोठी अपडेट!! ‘या’ पदांसाठी अग्निवीर भरती प्रक्रियेत झाले महत्वाचे बदल; जाणून घ्या….

Agniveer Recruitment
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी अर्ज (Agniveer Recruitment) करणाऱ्या उमेदवारांसाठी ही बातमी महत्वाची आहे. अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. तसेच लवकरच बंपर भरती देखील सुरु केली जाणार आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांसाठी ही मोठी संधी म्हणावी लागेल.

भारतीय लष्कराने अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. हा बदल 2024 -25 च्या भरती प्रक्रियेसाठी लागू होणार आहे. नुकतीच यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा नवा नियम लिपिक आणि स्टोअरकीपर पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी लागू असणार आहे.

कोणत्या पदासाठी बदलले नियम (Agniveer Recruitment)
विशेष म्हणजे हा नियम इतर भरती प्रक्रियेसाठी लागू नसेल. केवळ सेना लिपिक आणि स्टोअरकीपर पदांच्या भरती प्रक्रियेसाठी हा नियम असेल. यामध्ये या दोन्ही पदांसाठी उमेदवारांना टायपिंग चाचणी द्यावी लागणार आहे. अगोदरच्या नियमानुसार टायपिंग चाचणी देण्याची गरज नव्हती. मात्र आता त्या नियमामध्ये बदल करण्यात आला आहे.

असे आहेत नवे बदल
या टायपिंग चाचणीमध्ये उमेदवाराला हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिटप्रमाणे ही चाचणी द्यायची आहे. काही सेना अधिकाऱ्यांनी याबद्दलची पुष्टी (Agniveer Recruitment) देखील केली आहे. मात्र, अजून या टायपिंग चाचणीचे मानक ठरवण्यात आले नाहीत. याबद्दलचे सुधारीत बदल लवकरच जाहीर केले जातील.
या भरती प्रक्रियेसाठी बारावी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. सतत भरती प्रक्रियेबद्दल बदल हे केले जात आहेत. यासाठी आधी लेखी परीक्षा होईल आणि त्यानंतर भरती मेळावा आयोजित केला जाईल. टायपिंग चाचणीचा देखील यामध्ये समावेश होणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com