करिअरनामा ऑनलाईन । भारतीय वायुसेनेमध्ये सामील होण्याची (Agniveer Recruitment 2024) इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही अद्याप अग्निवीर वायुसेना भरतीसाठी ऑनलाइन अर्ज केला नसेल, तर तुम्हाला या भरतीमध्ये सामील होण्यासाठी संधी वाढवून देण्यात आली आहे. भारतीय हवाई दल अग्निपथ एअर सिलेक्शन टेस्टसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी या भरतीसाठी 28 जुलैपर्यंत अर्ज भरायचे होते. पण आता ही मुदत वाढवण्यात आली आहे. आता अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत 04 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार agnipathvayu.cdac.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
काय आहे आवश्यक पात्रता –
– अग्निवीर वायुच्या या भरतीसाठी केवळ अविवाहित महिला आणि पुरुष उमेदवार सहभागी होऊ शकतात.
– अर्ज पूर्ण झाल्यानंतर अग्निवीर भरती लेखी परीक्षा 18 ऑक्टोबर 2024 रोजी घेतली जाईल.
– अग्निवीर एअर रिक्रूटमेंटसाठी अर्ज करण्यासाठी (Agniveer Recruitment 2024) उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून भौतिकशास्त्र, इंग्रजी, गणित या विषयांमध्ये किमान ५० टक्के गुणांसह १२ वी उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष पदवी अभ्यासक्रम केलेला असावा.
– अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारचे किमान वय 17.5 वर्षे आणि कमाल वय 21 वर्षे असावी.
– या शिवाय पुरुष उमेदवारांची उंची 152.5 सेमी आणि महिला उमेदवारांची उंची 152 सेमी असावी.
– उमेदवारांचे वजन त्यांच्या उंचीनुसार असावे. तसेच सर्व श्रेणीतील उमेदवारांना 550 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
अशी होणार निवड (Agniveer Recruitment 2024) –
या भरतीमध्ये उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय चाचणी इत्यादीद्वारे केली जाईल. भरतीशी संबंधित इतर तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
अर्ज कसा करायचा –
1. भारतीय हवाई दलाची अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर जा.
2. यानंतर अग्निवीरवायू सेवा ०२/२०२५ वर जा.
3. नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, अर्जामध्ये विचारलेले सर्व तपशील सबमिट करा.
4. आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, अर्ज शुल्क जमा करा.
5. अर्जाची अंतिम प्रिंट आउट घ्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com