Agnipath Yojana :अग्निवीर भरतीत ‘हे’ मोठे बदल; इथे मिळेल संपूर्ण माहिती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अग्निवीर सैन्यदल भरतीच्या नियमांमध्ये काही (Agnipath Yojana) बदल करण्यात आले आहेत. पूर्वी शारीरिक चाचणी व त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जायची. आता मात्र यंदाच्या भरती प्रक्रियेत आधी लेखी परीक्षा आणि त्यानंतर शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी सांगितले.

अग्निवीर भरतीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नागपूर येथील सैन्यदल भरती केंद्राचे कर्नल आर. जगथ नारायण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर उपस्थित होते.

अग्निवीर भरती ऑनलाइन अर्ज प्रक्रिया www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नाव नोंदणीसाठी 15 मार्च 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर परीक्षा 17 एप्रिल ते 4 मे आणि निकाल 20 मे 2023 रोजी घोषित होणार (Agnipath Yojana) आहेत. विदर्भातील नागपूर, वर्धा, वाशीम, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला व यवतमाळ या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.

या पदभरतीच्या माध्यमातून अग्निवीर (जनरल ड्युटी), अग्निवीर (टेक्निकल), अग्निवीर (क्लर्क / स्टोअर किपर टेक्निकल), अग्निवीर ट्रेडसमन दहावी उत्तीर्ण, अग्निवीर ट्रेडसमन आठवी उत्तीर्ण ही पदे भरली जाणार आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील तरुणांना औरंगाबाद येथील भरतीमध्ये सहभागी होणार आहे. 5 ते 1 जुलै दरम्यान रॅलीचे आयोजन करण्याचे नियोजन आहे. सैन्यदलाच्या माध्यमातून देशातील (Agnipath Yojana) तरुणांना देशसेवेची संधी मिळणार आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेत अधिकाधिक तरुणांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com