Agnipath Yojana : Air Force मध्ये ‘या’ दिवसापासून सुरु होणार अग्निवीरांची भरती; पहा महत्वाच्या तारखा 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | भारतीय वायुसेनेने अग्निपथ योजनेअंतर्गत भरतीसाठी (Agnipath Yojana) अधिसूचना जाहीर केली आहे. अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांची ही भरती जानेवारी 2023 च्या बॅचसाठी केली जाणार आहे. 17.5 वर्षे ते 23 वर्षे वयोगटातील उमेदवार हवाई दलात भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. भारतीय हवाई दलात भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 7 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होणार आहे. तर ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, अग्निवीरांसाठी ऑनलाईन परीक्षा 18 ते 24 जानेवारी 2023 या कालावधीत घेतली जाणार आहे.

अग्निपथ योजनेअंतर्गत युवकांना हवाई दलात अर्ज करण्याची संधी दिली जाणार आहे. या योजनेंतर्गत तरुणांना चार वर्षे हवाई दलात सेवेची संधी मिळणार आहे. चार (Agnipath Yojana) वर्षांच्या सेवेनंतर उमेदवारांना मोठी रक्कमही दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

याशिवाय त्यांना अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. अग्निवीरांना दरवर्षी सेवेदरम्यान 30 दिवसांची रजाही दिली जाणार आहे. याशिवाय त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार आजारी रजाही दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

असे आहेत पात्रता निकष – (Agnipath Yojana)

भरती होणाऱ्या उमेदवारांना बारावीमध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजीमध्ये किमान 50 टक्के गुण आणि इंग्रजीमध्ये 50 टक्के गुण गरजेचे आहेत.

इंजिनीअरिंगमधून तीन वर्षांचा डिप्लोमा असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. त्यांना 50 टक्के गुण असणे गरजेचे आहे.

फिजिक्स आणि गणितसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी असणार आहे. (Agnipath Yojana)

अग्निवीर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची उंची 152.5 से. मी. असणे गरजेचे आहे.

कसा कराल अर्ज –

  1. हवाई दलात अर्ज करण्यासाठी agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. होमपेजवर गेल्यानंतर Apply Online वर क्लिक करा.
  3. उमेदवारांना प्रथम sign in करावे लागणार आहे.
  4. sign in केल्यानंतर तुम्हाला Login आणि password मिळणार आहे.
  5. तुम्हाला Login – passwordद्वारेच अर्ज भरावा लागणार आहे.
  6. शेवटी अर्जाची फी भरून फॉर्म सबमिट करायचा आहे.

अर्ज फी –

250/- रुपये

( सूचना – अर्ज फी डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंगद्वारे भरली जाऊ शकते.)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com