WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ऑनलाईन । भारतीय हवाई दलाने ‘अग्निवीर वायू भरती प्रक्रियेसाठी अर्ज (Agnipath Yojana 2022) मागवले आहेत. इच्छुक असलेले पात्र उमेदवार भारतीय हवाई दलाच्या विविध पदांसाठी careerindianairforce.cdac.in आणि agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाईटना भेट देऊन अर्ज करू शकतात. या पार्श्वभूमीवर आता इंडियन एअर फोर्सने भरती परीक्षेसाठी मॉडेल पेपर जारी केले आहेत. हे मॉडल पेपर्स डाउनलोड करता येणार आहेत.
‘ही’ आहे लिंक –
- इच्छुक उमेदवार https://careerindianairforce.cdac.in/assets/joining या लिंक वर क्लिक करून अधिकृत नोटिफिकेशन तपासून पाहू शकतात.
- अग्निवीर वायू भरती प्रक्रिया-2022 अंतर्गत अनेक पदांची भरती केली जाणार आहे. (Agnipath Yojana 2022)
- या भरती प्रक्रियेसाठी 29 डिसेंबर 1999 ते 29 जून 2005 या यादरम्यान जन्म झालेले उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहेत.
असा डाउनलोड करा मॉडेल पेपर – (Agnipath Yojana 2022)
- सर्वप्रथम agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- आता उमेदवार विभागात जा आणि ड्रॉप डाउन मेनू उघडा.
- यादीतील Syllabus आणि Model Paper च्या पर्यायावर क्लिक करा.
- नवीन पृष्ठावर विषय निवडा. (Agnipath Yojana 2022)
- Syllabus आणि Model Paper ची PDF स्क्रीनवर ओपन होईल, ती डाउनलोड करा.
असे आहेत फायदे –
- अग्निवीर अंतर्गत नोकरी मिळाल्यानंतर उमेदवारांना पहिल्या वर्षी दरमहा 30,000 रुपये पगार असेल.
- त्यात पहिल्या वर्षी 21,000 रुपये इनहँड पगार (In hand Salary ) तर दरमहा 9,000 रुपये भारत सरकारच्या कॉर्पस फंडमध्ये (Corpus Fund) जमा होईल.
- दुसऱ्या वर्षी पगार दरमहा 33,000 रुपयांवर (Agnipath Yojana 2022) जाईल. त्यात 23,100 रुपये हातात मिळतील. तर 9,900 कॉर्पस फंडमध्ये जातील.
- तिसऱ्या वर्षी पगार दरमहा 36,500 असेल. यातील 25,550 रुपये हातात मिळतील आणि 10,950 रुपये कॉर्पस फंडमध्ये जाणार आहेत.
- चौथ्या वर्षी मासिक पगार दरमहा 40,000 रुपये असणार आहे. यातील 28,000 रुपयांची रक्कम हाती मिळेल आणि दरमहा 12,000 रुपये कॉर्पस फंडमध्ये जमा होणार आहेत.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com