करिअरनामा ऑनलाईन | अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय नौदलात नोकरी (Agnipath Scheme 2022) करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. भारतीय नौदलाने (Indian Navy) ‘अग्निवीर भरती प्रक्रिया-2022’ साठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार विविध पदांसाठी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
या पदावर होणार भरती –
भारतीय नौदलाने अग्निवीरांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. अग्निवीर (SSR) आणि अग्निवीर (MR) अशा दोन प्रकारच्या पदांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. एसएसआर 12वी पास उमेदवारांसाठी आहे, तर एमआर 10 वी पास उमेदवारांसाठी आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
For SSR –
- उमेदवारांनी 12 वी परीक्षा उत्तीर्ण केली असणे आवश्यक आहे.
- रसायनशास्त्रज्ञ, जीवशास्त्र किंवा (Agnipath Scheme 2022) संगणक शास्त्र यापैकी एका विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक.
For MR –
- उमेदवारांनी 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – 17 ते 23 वर्षे
मिळणारे वेतन – (Agnipath Scheme 2022)
- निवड झालेल्या अग्निवीरांना पहिल्या वर्षी 30,000/- रुपये दरमहा
- दुसऱ्या वर्षी 33,000/- रुपये दरमहा
- तिसऱ्या वर्षी 36,500/- रुपये दरमहा
- चौथ्या वर्षी 40,000/- रुपये दरमहा वेतन दिले जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे –
- अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी नोंदणी करण्यापूर्वी ही कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे-
- मॅट्रिक प्रमाणपत्र
- 10+2 गुणपत्रिका (Agnipath Scheme 2022)
- उमेदवाराच्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राची स्कॅन केलेली प्रत
- अधिवास प्रमाणपत्र
- NCC प्रमाणपत्र (असल्यास)
अशी असेल निवड प्रक्रिया – (Agnipath Scheme 2022)
- लेखी परीक्षेच्या आधारे अग्निविरांची निवड केली जाईल.
- त्यानंतर लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना शारीरिक तंदुरुस्ती चाचणी द्यावी लागेल.
- लेखी आणि शारीरिक तंदुरुस्ती या दोन्ही चाचण्यांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
असा करा अर्ज –
- भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- तुमचा ई-मेल आयडी (Agnipath Scheme 2022) आणि मोबाईल नंबरसह स्वतःची नोंदणी करा.
- नोंदणीकृत ई-मेल आयडीने लॉग इन करा आणि “Current Opportunities” वर क्लिक करा. “Apply” बटणावर क्लिक करा.
- आवश्यक तपशीलांसह फॉर्म भरा.
- सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- पात्रतेसाठी ऑनलाइन अर्जांची आणखी छाननी केली जाईल आणि कोणत्याही बाबतीत अपात्र आढळल्यास अर्ज कोणत्याही टप्प्यावर नाकारले जाऊ शकतात.
अधिकृत वेबसाइट – joinindiannavy.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com