स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत घेतल्या जाणाऱ्या  कनिष्ठ सहकारी पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध

करिअरनामा ।स्टेट बँक ऑफ इंडियाने कनिष्ठ सहकारी पूर्व परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ज्युनिअर असोसिएट आणि सेल्स पदांसाठी आयोजित केलेल्या परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे, त्यांनी हे प्रवेशपत्र बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करावेत. परीक्षा ८ मार्च २०२० रोजी होणार आहे.

उमेदवार आपले प्रवेशपत्र ८ मार्चपर्यंत डाऊनलोड करू शकतात. यावर परीक्षेची तारीख, परीक्षा केंद्राचा पत्ता, वेळ आदी माहिती असेल. ८ मार्च रोजी पूर्व परीक्षा होणार आहे. यात उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेकरिता बोलावले जाईल. मुख्य परीक्षा १९ एप्रिल रोजी होणार आहे. मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेपूर्वी दोन आठवडे आधी येतील.

उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की हे प्रवेशपत्र पोस्टाने वा अन्य कोणत्या प्रकारे तुमच्यापर्यंत येणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला ते संकेतस्थळावरूनच घ्यावे लागतील. दिलेल्या लिंक वरुन  बँकेच्या वेबसाइटवर त्यासाठी लॉगइन करावे लागेल.

महत्त्वाच्या तारखा –

      प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख – ११ फेब्रुवारी २०२०

          प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख – ३ मार्च २०२०

 येथे प्रवेशपत्र डाउनलोड करा – click here

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”