करिअरनामा ऑनलाईन । अभियांत्रिकी प्रवेशासाठी आज (दि. ९ ऑगस्ट) पासून (Admission) दि. ११ ऑगस्ट दरम्यान उमेदवारांना कॅप राउंड 1 साठी ऑप्शन फार्म भरता येणार आहे. यासह एमबीए प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या उमेदवारांना दि. 11 ऑगस्टपासून आपले ऑप्शन फाॅर्म भरता येणार आहेत.
अभियांत्रिकी प्रवेशासाठी प्रतीक्षेत असलेल्या (Admission) उमेदवारांना दि. ९ ऑगस्ट पासून ऑप्शन फाॅर्म भरता येणार आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून प्रवेशफेरीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून त्यानुसार दि. ९ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान उमेदवारांना कॅप राउंड १ साठी ऑप्शन फार्म भरता येईल. एमबीए प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून या उमेदवारांना देखील दि. ११ ऑगस्टपासून आपले ऑप्शन फाॅर्म भरता येणार आहेत.
अभियांत्रिकीसाठी 13 ऑगस्टला होणार जागा वाटप (Admission)
सीईटी सेलकडून (CET Cell) प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार उमेदवारांना ९ ते ११ ऑगस्टपर्यंत ऑप्शन फॉर्म भरता येणार आहेत. तसेच एमबीएच्या प्रवेशासाठी कॅप राउंडचे ऑप्शन फॉर्म १० ऑगस्टपासून सुरू होतील. जागांचे पहिले वाटप १३ ऑगस्टला होणार आहे. तर १४ ते १७ ऑगस्ट या कालावधीत महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. पहिल्या फेरीत जागा रिक्त राहिल्यास दुसऱ्या फेरीची प्रक्रिया २० ऑगस्टनंतर सुरू होईल. म्हणजे तिसरी फेरी सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल.
एमबीए प्रवेशाचे 15 ऑगस्टला होणार जागा वाटप
अभियांत्रिकीसोबतच एमबीए प्रवेशासाठी पहिल्या कॅप फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे १० ऑगस्टपासून सुरू होईल. ही प्रक्रिया १२ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. तर जागांचे वाटप १५ तारखेला (Admission) होणार आहे. १६ ते १८ ऑगस्ट या कालावधीत तुम्हाला कॉलेजमध्ये रिपोर्ट करावे लागेल. तसेच एमसीएचे ऑप्शन फॉर्म ९ तारखेपासून पासून भरले जातील. प्रवेश निश्चित करण्यासाठी तुम्हाला १४ ते १७ ऑगस्ट या कालावधीत महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com