करिअरनामा ऑनलाईन। शासकीय सेवेत सद्यस्थितीत अनुसूचित जमातीकरिता 1 लाख 55 हजार 696 राखीव (Adivasi Vikas Vibhag Bharti) पदे आहेत. त्यापैकी 1 लाख 9 पदे भरण्यात आली आहेत. विविध विभागात अद्याप अनुसूचित जमातींची 55 हजार 687 पदे रिक्त आहेत.
आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण आणि शासकीय नोकरी हे प्रभावी माध्यम आहे. परंतु, राज्य शासनाने अनुसूचित जमातीची विविध खात्यांमधील 55 हजार 687 पदे रिक्त ठेवून त्यांना सामाजिक न्यायापासून दूर लोटण्याचे काम केल्याचा आरोप आता होत आहे. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाला माहिती सादर केली. त्यानुसार, शासकीय सेवेत सद्यस्थितीत अनुसूचित जमातींकरिता 1 लाख 55 हजार 696 राखीव पदे आहेत. त्यापैकी 1 लाख नऊ पदे भरण्यात आली आहेत. विविध विभागात अद्याप अनुसूचित जमातींची 55 हजार 687 पदे रिक्त आहेत. राज्याचे मुख्यमंत्री व वित्त विभागाची मंजुरी घेऊन लवकरच विशेष पदभरती मोहीम राबवण्यात येईल, असेही श्रीवास्तव यांनी राष्ट्रीय जनजाती आयोगाला सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने जगदीश बहिरा प्रकरणी दिलेल्या निकालाची अंमलबजावणी, अधिसंख्य पदे, अधिसंख्य पदांच्या रिक्त जागांवरील नियुक्ती, जात पडताळणी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने अनुसूचित जमातीच्या राखीव संवर्गासाठी विशेष भरती इत्यादी विषयावरील अहवाल 8 ऑगस्ट 2022 रोजी आयोगाला सादर करण्यात आला. ही सुनावणी आयोगाचे सदस्य अनंत नायक यांच्या समोर झाली. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमित भांगे हे देखील यावेळी हजर होते. या प्रकरणातील तक्रारकर्ते राळेगावचे आमदार डॉ. अशोक उईक हे सुनावणीत ऑनलाईन सहभागी झाले होते. सर्वोच्च (Adivasi Vikas Vibhag Bharti) न्यायालयाच्या जगदीश बहिरा निकालानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यात काय पावले उचलली गेली, जात पडताळणी कायद्याच्या तरतुदींची जमातीचे दावे अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांवर कशी अंमलबजावणी करीत आहेत. अधिसंख्य पदांच्या अनुषंगाने भुजबळ समितीचा अहवाल, अनुसूचित जमातीची रिक्त पदे, 21 डिसेंबर 2019 च्या शासन निर्णयानंतर अनुसूचित जमातीची भरलेली पदे, न्यायालयीन प्रकरणे इत्यादी मुद्यांवर मुख्य सचिवांना आयोगाने विचारणा केली.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com