काय सांगता ! अमरावती विद्यापीठात पेपर तपासण्यासाठी एकाच दिवशी सुमारे ८१० प्राध्यापक…

करिअरनामा।  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागात पेपर तपासण्याची कामे सुरु करण्यात आली आहेत. शुक्रवारी येथे सुमारे ८१० प्राध्यापकांनी पेपर तपासण्यासाठी उपस्थिती लावली होती. प्राध्यापकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावल्याने परीक्षा विभागात बसायला ही जागा राहिली नव्हती.

दरम्यान महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा संपल्यापासून ४५ दिवसांत निकाल जाहीर करणे हि नियमावली आहे. मात्र एवढे असून देखील अमरावती विद्यापीठात काही वर्षांपासून निकाल वेळेत जाहीर केले जात नाहीत. त्यामुळे परीक्षा व निकालात त्रुटी तसेच पेपर तपासण्यासाठी जे प्राध्यापक अनुपस्थित राहतील त्या प्राध्यापकांवर ५ हजार रुपये दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद अशी कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रथम सत्रातील परीक्षे दरम्यान केंद्रावर केंद्राधिकारी तसेच प्राध्यापकांनी उपस्थिती दर्शविली होती.

यावेळी परीक्षा विभागात प्राध्यापकांची जणू यात्रा भरली की काय असं चित्र दिसत होत. अमरावती विद्यापीठा अंतर्गत पाचही जिल्ह्यांतून प्राध्यापकांची गर्दी झाल्याने परीक्षा विभागात बसण्यासाठी जागाही अपुरी पडली. त्यामुळे परीक्षा विभागाने तात्काळ छतावर पेंडाल टाकला. शुक्रवारी पेंडालमध्येही प्राध्यापकांना जागा अपुरी पडली. परिणामी परीक्षा विभागात मिळेल त्या ठिकाणी टेबल टाकून पेपर तपासण्याचे काम करण्यात आले. सध्या काही विभागांच्या परीक्षा देखील विद्यापीठात सुरु आहेत. त्यामुळे एकीकडे परीक्षा अन दुसरीकडे पेपर तपासणे असे चित्र सध्या येथे पहायला मिळत आहे.

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]