Aaple Guruji : शिक्षकांचा फोटो वर्गात लावणं बंधनकारक केल्यानं शिक्षकांमध्ये नाराजी; पहा काय आहे प्रकरण

करिअरनामा ऑनलाईन। सरकारनं ‘आपले गुरुजी’ मोहिमेसाठी परिपत्रक काढून शिक्षकांचा फोटो वर्गात लावणं (Aaple Guruji) बंधनकारक केलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. परिपत्रक मागे घेतलं नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे. शिक्षकांवर अविश्वास दाखवणं अयोग्य असल्याचं संघटनांनी म्हणलं आहे.

‘आपले गुरुजी’ या नावाने राज्य सरकारने परिपत्रक जरी केले आहे. या परिपत्रकानुसार शिक्षकांना स्वतःचा फोटो त्या त्या वर्गांमध्ये लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार येत्या दोन आठवड्यात याबाबत पूर्तता करण्याची सूचना देण्यात आली आहे.

तर दुसरीकडे या परिपत्रकाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सरकार शिक्षकांना वर्गांमध्ये फोटो लावण्यास सांगून शिक्षकांबाबत अविश्वास दाखवत आहे का? राज्य सरकारचा शिक्षकांवर विश्वास नाही का? असा सवाल शिक्षकांनी केला आहे. विविध शिक्षक संघटनांनी या परिपत्रकाचा निषेध केला आहे.

सरकारने जारी केलेल्या या परिपत्रकास विरोध करत महाराष्ट्र राज्य प्राथमिक (Aaple Guruji) शिक्षक समितीचे अध्यक्ष उदय शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहलं आहे. ‘राज्य सरकार सन्मानाच्या नावाखाली शिक्षकांचा अवमान करत आहे;’ असा उल्लेख शिंदे यांनी या पत्रामध्ये केला आहे. हे परिपत्रक मागे घेतले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे.

Aaple Guruji circular

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com