यशोगाथा: कठोर परिश्रमामधून मधुमिताने आपले स्वप्न केले पूर्ण! तिसऱ्या प्रयत्नामध्ये मिळाले UPSC मध्ये यश

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अनेक यशस्वी विद्यार्थी आणि माणसांच्या मागे एक परिश्रमाची कहाणी असते. अनेक प्रकारचे त्याग त्यांनी केलेले असतात. यूपीएससी परीक्षा देणारे आणि त्यामध्ये यशस्वी होणारे विद्यार्थी यांनीही अनेक प्रकारचे त्याग केलेले असतात. सामाजिक माध्यमे आणि सामाजिक जीवन यांचा त्याग त्यांना करावा लागतो. सोबतच, मोठ्या प्रमाणात अभ्यास करून अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. अशा एका विद्यार्थिनीचा प्रवास आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जिने दोन वेळा अपयश येऊनही तिसऱ्या वेळा कठोर परिश्रम घेऊन यश खेचून आणले. आणि देशभरामधून 86 वा रँक मिळवून IAS म्हणून निवड झाली.

हरियाणाच्या पानिपत येथे राहणारी मधुमिता हिने बीबीए मध्ये डिग्री पूर्ण केली. त्यानंतर, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करून यूपीएससीची तयारी करण्याची सुरुवात केली. तिच्या कुटुंबाची ही इच्छा होती कि तिने IAS बनावे. त्यामुळे, सर्वांनी तिला पूर्णपणे सपोर्ट केला होता. मधुमिताने 2017 साली युपीएससीचा पहिला प्रयत्न दिला. त्यामुळे तिला एक अपयश आले. त्यानंतर तिने परीक्षा तयारी करण्याची पद्धत बदलली. सोशलमीडियापासून तिने अंतर ठेवले. आणि घरातल्या कुठल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाली नाही. अतिशय कठोर दिनचर्या अंगीकारून तिने हा अभ्यास केला.

या कठोर अभ्यासक्रमाचा फायदा तिला तिसऱ्या प्रयत्नामध्ये झाला. ते आपल्या यशाबद्दल बोलताना सांगते की, ‘युपीएससी परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर, सतत मेहनत करणे गरजेचे आहे. यासोबतच, सोशल मीडिया आणि इतर गोष्टींपासून लांब राहावे लागेल. अभ्यासावर नेहमी फोकस करणे गरजेचे आहे. अभ्यासक्रम पूर्ण करून सोबतच, लेखनाची प्रॅक्टिस करणेही गरजेचे आहे. यानंतर, मॉक टेस्ट दिल्यानंतर आपल्याला आपल्या चुका समजून येतील व त्या चुकांमध्ये सुधार केल्यास नक्कीच यश मिळेल.