यशोगाथा: छोट्याश्या गावातील शेतकऱ्याचा मुलगा बनला IAS अधिकारी; जाणून घ्या प्रदीप यांचा संघर्षमय प्रवास

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षा म्हटले कि, प्रचंड कष्ट आणि पुस्तकांची मोठीच मोठी यादी डोळ्यासमोर येते. यातून पास होतो तो अधिकारी होतो. पण त्यासाठी प्रचंड कष्ट लागते. अशीच कष्टाची कहाणी बारीगढ, छतरपूर बुंदलखंडचे राहणारे प्रदीप कुमार यांची आहे. त्यांनी कठोर मेहनतीतून यश संपादन केले आहे. या काळात त्यांना अनेक समस्या आल्या. पण, त्या सर्वांचा त्यांनी सामना केला. प्रदीप यांनी इंजिनियरिंगमधून आपले ग्रेजुएशन केले. आणि, त्यानंतर त्यांनी नोकरी केली. त्यादरम्यानच त्यांना सिव्हिल सर्व्हिसचा विचार आला. खुप विचार केल्यानंतर त्यांनी तयारी सुरू केली. आणि थोड्या दिवसातच यशाला गवसणी घातली.

प्रदीप हे खुप सामान्य कुटुंबातून येतात. त्यांचे वडील शेतकरी आणि आई गृहिणी आहे. प्रदीप यांनी प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावीच पूर्ण केले. त्यानंतर, ते इंजिनिअरिंगसाठी भोपाळला आले. सुरुवातीला त्यांच्या मनात सिव्हिल सर्व्हिसची तयारी करण्याचे अजिबात नव्हते. ग्रेजुएशननंतर मध्य प्रदेश इलेक्ट्रिसिटी बोर्डमध्ये ‘असिस्टंट इंजीनियर’ या पदावर त्यांनी नोकरी केली. त्यांनी सांगितले की, सुरवातीला त्यांनी निर्णय घेतला की दोन वेळा परीक्षा दिल्यानंतर त्यांना यश मिळाले नाही तर, पुढे ते प्रयत्न करणार नाही. त्यांनी या दरम्यान पण कधी हिम्मत हारली नाही. आणि, नेहमी तयारी करत राहिले.

प्रदीप यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना परीक्षा पास होण्यास तीन वर्ष लागली. मात्र त्यांचे यूपीएससीमध्ये सिलेक्शनच्या दुसर्‍याच वर्षी झाले होते. प्रदीप दुसऱ्या अ‍ॅटेम्प्टमध्ये 491 रँकने पास झाले होते. त्यांनी या रँकद्वारे मिळालेली सर्व्हिस पण ज्वॉइन केली होती. पण ते सतत तयारी करत होते. प्रदीप यांनी वर्ष 2018 मध्ये तिसऱ्या वेळा परीक्षा दिली आणि 74 व्या रँकसह IAS पदांसाठी निवडले गेले. प्रदीप म्हणतात की, ‘मेन्स आणि प्रीलियम दोघांची तयारी ही सोबत केली पाहिजे’. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की, त्यांनी कोणती कोचिंग जॉईन नाही केली. ते ऑनलाइन माध्यमातून तयारी करत. ते म्हणतात की, ऑनलाईन सगळ उपलब्ध आहे. जे आपल्याला लागते. प्रदीप मानतात की, या परीक्षेत उत्तीर्ण होण्यापासून सेल्फ स्टडीचा मोठा सहभाग आहे. आपण शेड्यूल बनवा आणि रोज अभ्यास करा. जेव्हा आपण रोज अभ्यास करू शकत नाही तेव्हा, आपले यशस्वी होण्याचे चान्सेस कमी होतात. आणि प्रत्येक पेपरला सारखेच महत्व दिले गेले पाहिजे.

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com