यशोगाथा: पहिल्या 3 प्रयत्नात पूर्व परीक्षासुद्धा पास झाली नाही; चौथ्या प्रयत्नात देशात टॉपर येऊन रुची बनल्या IAS अधिकारी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | यूपीएससी परीक्षा ही देशातील खूप कठीण असलेल्या परिक्षापैकी एक आहे. एखाद्याला पटकन यश मिळते तर, एखाद्याला वेळ लागतो. ज्यांना वेळ लागतो त्यांना बर्‍याच आव्हानांचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उमेदवाराची कहाणी सांगणार आहोत! ज्यांनी सर्व प्रकारच्या अडचणीनंतरही हार मानली नाही व प्रयत्न सुरू ठेवले. जिचे नाव रुचि बिंदल आहे. रुची यांना यूपीएससीची परीक्षा पास होण्यास पाच वर्षे लागली. त्यांनी कठोर परिश्रम व समर्पणासह सन 2019 मध्ये यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि ते ही अव्वल येऊन. त्या थेट आयएएस रँकसाठी निवडल्या गेल्या.

त्यांचा प्रवास असा होता

पहिल्या तीन प्रयत्नात रूची बिंदल यांना पूर्व परीक्षा देखील पास करता आली नाही. पण त्या कधीही निराश झाल्या नव्हत्या आणि कठोर परिश्रम करत राहिल्या. तथापि, हे इतके सोपे नव्हते. चौथ्या प्रयत्नात त्यांनी मेन्स गाठली. पण, निवड झाली नाही. यानंतर, त्यांनी आपल्या चुका सुधारल्या. अखेरीस, त्यांच्या कित्येक वर्षांच्या मेहनतीच्या परिणामाची परिणीती झाली आणि पाचव्या प्रयत्नात त्यांनी तिन्ही चरण पार केले. आणि देशभरातून 39 व्या क्रमांकासह टॉपर्सच्या यादीत आपले नाव नोंदविले.

पूर्व परीक्षेच्या तयारीबद्दल बोलताना रुची सांगतात की, ही परीक्षा क्लिअर करण्यासाठी खूप अभ्यास करा. आणि बराच सराव करा. हा पास होण्याचा एकमेव मार्ग आहे. एखाद्याने एकाच विषयाचे बरेच स्त्रोत गोळा करू नये. त्यांना मर्यादित ठेवा. तयारी झाल्यावर खूप टेस्ट सिरीज द्या. रुची संपूर्ण पेपर तीन फेरीत सोडवत असत. पहिल्या फेरीत त्या अशे प्रश्न सोडवत असत, ज्या प्रश्नांसाठी त्या एकदम खात्रीशीर असत. दुसर्‍या फेरीत, ज्या प्रश्नांमध्ये त्यांना माहित होते की, चार पर्यायापैकी दोन किंवा तीन चुकीचे आहेत, त्यानंतर त्या सर्वात शेवटी असे प्रश्न सोडवायच्या. ज्यामध्ये, त्या सर्वात गोंधळलेल्या असायच्या. त्यामुळे, त्याचा फायदा त्यांना झाला. आणि चौथा प्रयत्नात त्या पूर्व परीक्षा पास होऊन, मुख्य आणि मुलाखत देऊन पास झाल्या आणि आयएएस पदी विराजमान झाल्या.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com