करिअरनामा ऑनलाईन । काही मुलं लहानपनापासूनच एकदम हरहुन्नरी असतात. त्यांना भविष्यात काय करायचे हे माहिती असते. त्या मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.अशीच कहीशी सुरभी गौतम यांची कथा आहे. प्रतिष्टीत IES परीक्षेत सुरभीने पूर्ण भारतातून पहिला नंबर मिळविला. आणि त्यानंतर आता २०१६ साली सुरभी संपूर्ण भारतात ५०वी rank मिळवून IAS झाली आहे. सुरभीचे वडील हे मैहर सिविल कोर्टमध्ये वकील आहे आणि आई डॉक्टर सुशीला गौतम अमदरा येथे शाळेत शिक्षिका आहे. सुरभी लहानपणापासून अभ्यासात हुशार आहे. दहावीत सुरभीला ९३.४% एवढे गुण मिळाले होते. हेच ते गुण आहेत ज्या गुणामुळे सुरभीच्या यशाचा पाया रचला होता. हे मार्क मिळविल्यानंतर सुरभीने कलेक्टर होण्याचे स्वप्न बघितले. आणि यानंतर प्रवास सुरु झाला IAS होण्याचा.
सुरभीचे लहानपण तसे सर्वसामान्य मुलांचे जाते तसेच गेले. मुलाची एका छोट्या खेड्यातली असलेली सुरभी अभ्यासात हुशार होती. सुरभी चे गाव अमदरा एक छोटेस खेड आहे. अमदरा येथूनच तिने १२वी पर्यंतचे शिक्षण घेतले. १२वी पर्यंत तिने सरकारी शाळेतच शिक्षण घेतले. या शाळेत मुलभूत सुविधा सुध्दा नव्हत्या त्या शाळेत तिने शिक्षण पूर्ण केले. सुरभीच्या गावात वीज आणि पाण्यासारख्या मुलभूत सुविधा नव्हत्या तर परिपूर्ण शिक्षण दूरच राहिले. ती सांगते कि लहानपणी ती दिव्यात अभ्यास करत असे. बारावी नंतर तिने इंजिनियरिंग प्रवेश परीक्षा दिली आणि त्यामध्ये चांगले गुण घेऊन तिने परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर सुरभीने भोपाळ येथून इलेक्ट्रोनिक आणि कम्युनिकेशन मध्ये इंजिनियरिंग पदवी पूर्ण केली. इथे सुध्दा सुरभीने पहिला नंबर मिळवायची सवय सोडली नाही तिने सुवर्ण पडत घेत विद्यापीठातून पहिला नंबर मिळविला.
कॉलेज संपल्यावर सुरभी ने BARC मध्ये वैज्ञानिक म्हणून नौकरी केली त्यानंतर सुरु झाली घोडदौड परीक्षा पास होण्याची एका वर्षात सुरभी ने SAIL, GATE, ISRO, MPPSC PRE,SSC LGL, Delhi Police आणि FCI एवढ्या परीक्षा चांगल्या मार्काने पास केल्या. २०१३ मधील IES परीक्षेत सुरभीने पूर्ण भारतातून पहिला नंबर मिळविला. आणि त्यानंतर आता २०१६ साली सुरभी संपूर्ण भारतात ५०वी rank मिळवून IAS झाली आहे. सुरभी प्रमाणे यश फार कमी लोकांना मिळते. तिने परीक्षा सुध्दा पहिल्याच प्रयत्नान पास केली. सुरभी लहानपणापासून एक जवाबदार आणि मोठे स्वप्न बघणारी मुलगी आहे. ती सांगते या सर्व गोष्टीची प्रेरणा तिला पालकाकडून मिळत होती. सुरभीने कधीही कोणत्या विषयाची शिकवणी वर्ग लावला नाही. स्वतः अभ्यास करून तिने शिक्षण पूर्ण केले. शाळेत तिला वेळेवर कधी पुस्तके मिळत नसे किंवा पूर्ण सुविधा मिळत नव्हत्या. म्हणून तिला मोठे काम करायची प्रेरणा मिळाली. तिचा हा प्रेरणादायी प्रवास नक्कीच अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल.