कायद्याचं बोला | तुम्ही कधी कोर्टात गेला असाल तर तुम्हाला कोर्टाच्या आवारात इथे नोटरी करुन मिळेल अशा पाट्या हमखास पहायला मिळतात. अनेकवेळा विविध कायदेशीर बाबींकरता आपल्याला नोटरी करणे बंधनकारक असते. अशावेळी लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत काही वकिलांकडून वाजवी शुल्क आकारले जाते. भारत सरकारने कोणत्या कामासाठी किती रुपये नोटरी शुल्क आकारायचे हे ठरवून दिले आहे. नावात दुरुस्ती असेल, शिक्षणात खंड पडला असेल तर त्यासाठी काढावे लागणारे गॅप सर्टिफिकेट अशा बऱ्याच कामांसाठी आपल्याला नोटरीकडे जावे लागते. नोटरीला मराठीमध्ये लेखाप्रमाणक असे म्हणतात. लेखाप्रमाणक नियम, १९५६ यातील कलम १० मध्ये लेखाप्रमाणकांना (Notary) त्यांच्या कामासाठी द्यायचे शुल्क नमूद केले आहे. आज आपण त्याबद्दल माहिती घेणार आहोत.
नोटरी हा एखादा वकील किंवा कायदेशीर व्यक्ती असतो ज्याला केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने “Notary Act 1952” अंतर्गत नियुक्त केलेले असते. नोटरी संबंधित सर्व तरतुदी या लेखाप्रमाणक कायदा, १९५२(The Notary Act, 1952) व लेखाप्रमाणक नियम, १९५६ (The Notaries Rules, १९५६) मध्ये दिल्या आहेत. लेखाप्रमाणक नियम, १९५६ यातील कलम १० मध्ये लेखाप्रमाणकांना(Notary) त्यांच्या कामासाठी द्यायचे शुल्क नमूद केले आहे. आज आपण त्याबद्दल माहिती घेऊया-
फीस –
१) दस्तऐवज/ करारनामा यांची नोंद करण्यासाठी (for noting an instrument)
यासाठी लागणारी फीस ही करारनामा / दस्तऐवज या मधील रकमेनुसार वेगळी आहे. आणि ती खालील प्रमाणे-
रक्कम फीस
रु. १०,००० पर्यंत रु. ५०
रु. १०,००० – रु. २५,००० रु.१००
रु. २५,००० – रु. ५०,००० रु. १५०
रु. ५०,०००पेक्षा जास्त रु. २००
२) दस्तऐवज/ करारनामाची वचनचिठ्ठी नोंदवण्यासाठी (for protesting an instrument) यासाठी लागणारी फीस ही करारनामा/दस्तऐवज या मधील रकमेनुसार वेगळी आहे. आणि ती खालील प्रमाणे-
रक्कम फीस
रु. १०,०००पर्यंत रु. ५०
रु. १०,००० – रु. २५,००० रु. १००
रु. २५,००० – रु. १,००,००० रु. १५०
रु. १,००,००० पेक्षा जास्त रु. २००
३)for recording a declaration of payment for honour – रु. १००
४) वचनचिठ्ठीची दुसरीप्रत/नक्कल (duplicate protests) –
मूळ रकमेपेक्षा अर्धे शुल्क
५) एखाद्या दस्तऐवज/ करारनामा यांची पडताळणी, प्रमाणिकृत किंवा सत्यप्रत करण्यासाठी(for verifying, authenticating, certifying or attesting the execution of any
instrument)
- रु. ३५
६) कोणतीही शपथपत्र, हुंडी किंवा विनिमयाची पावती सादर करण्यासाठी स्वीकृती किंवा देयक किंवा चांगल्या सुरक्षिततेची मागणी करणे (for presenting any promissory note, hundi or bill of exchange for
acceptance or payment or demanding better security)
- रु. ५०
७) शपथ देण्यासाठी किंवा कोणत्याही व्यक्तीकडून प्रतिज्ञापत्र घेण्यासाठी (for administering oath to, or taking affidavit from any person) – रु. ३५
८) ज्या दस्तऐवज/ करारनामाचा प्रभाव कोणत्याही देशात अथवा भारताबाहेर असेल आणि तो त्या देशातील कायदा आणि भाषेशी सुसंगत असेल व तेथे त्याची अंमलबजावणी होणार असेल (for preparing any instrument intended to take effect in any country or
place outside India in such form and language as may conform to the law of
the place where such deed is intended to operate)
- रु. २००
९) भाषांतर किंवा भाषांतरित कागतपत्रे तपासणी करण्यासाठी- रु. १००
१०) जहाजाची वचनचिठ्ठी नोंदवण्यासाठी आणि काढण्यासाठी, नौका वचनचिठ्ठी किंवा विलंब शुल्क संबंधित किंवा इतर व्यावसायिक बाबींसाठी वचनचिठ्ठी (for noting and drawing up ship’s protest, boat protest or protest relating
to demurrage and other commercial matters) – रु. २००
११)मूळच्या कागदपत्रांच्या प्रती खर्या प्रती म्हणून प्रमाणित करण्यासाठी – एका कागदास रु. १० प्रमाणे, कमीत कमी रु. २०
१२) कोणतेही इतर लेखाप्रमाणक(Notary) कामासाठी –
यासाठीचे शुल्क योग्य सरकार वेळोवेळी निश्चित करेल
लेखक –
ॲड स्नेहल जाधव, कायदाअभ्यासक
अद्वैत देशपांडे, कायदाअभ्यासक
(लेखक “कायदादूत” नावाचे फेसबुक पेज चालवतात. समाजकल्याणासाठी भारतीय विधिमंडळाने अनेक कायदे तयार केलेले आहेत. सर्वसामान्यांना या कायद्याची तितकीशी माहिती नसते. शिवाय कायद्याच्या किचकट भाषेमुळे अनेक कायदे समजण्यास कठीण जातात. त्यामुळे कित्येकदा योग्य पाऊल न उचलल्यामूळे कित्येक लोक न्यायापासून वंचित राहतात किंवा योग्य न्यायमार्गापासून भरकटले जातात. म्हणून काही महत्वाच्या कायद्यांतील महत्वाच्या तरतुदी मराठी मध्ये एक एक करून पोस्ट द्वारे लोकांपर्यंत पोहचवण्याचा छोटासा प्रयत्न हे कायदादूत फेसबुक पेज करत आहे.)
फेसबुक पेज लिंक – https://www.facebook.com/kaydadut/