10 वी बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी बोर्डाकडून पुन्हा मुदतवाढ; 2 फेब्रुवारीपर्यंत मुदत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । दहावी बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी बोर्डाकडून मुदतवाढ देण्यात आली. आता विद्यार्थी 2 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरु शकतील. बोर्डाकडून अर्ज भरण्यासाठीच्या मुदतवाढीबाबत परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. दहावी बोर्ड परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी २५ जानेवारी ही अंतिम मुदत होती. आता ही अवधी 2 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

दहावी बोर्ड परिक्षेचे अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यात आज दहावी बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने विद्यार्थी चिंतेत होते. अनेक विद्यार्थी एकावेळेस अर्ज भरत असल्याने सकाळी 10 वाजेपासून वेबसाईट हँग झाली होती. एप्रिल २०२१ मध्ये होणाऱ्या इ. १० वी परीक्षेचे नियमित शुल्कासह अर्ज भरण्यास दि. २ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विलंबित शुल्कासह ३ ते १३ फेब्रुवारी २०२१ मुदत असणार आहे. अधिक माहितीसाठी http://mahahsscboard.in इथे भेट द्यावी.

त्यात अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरणे कठीण झाले होते. आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने विद्यार्थी, पालक ,मुंबई मुख्यध्यापक संघटना यांनी बोर्डाने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. याबाबत बोर्डाने तांत्रिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू असून लवकर दूर केल्या जातील शिवाय मुदतवाढ बाबत अजून विचार झाला नसल्याचं सांगितलं होतं.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com