UPSC NDA Exam 2021I परीक्षेसाठी नोंदणी 30 डिसेंबर पासून सुरू ; असे करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।केंद्रीय लोक सेवा आयोग (UPSC) ने राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौदल अकादमी (NA) परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे. यूपीएससी एनडीए १ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३० डिसेंबर २०२० पासून सुरू होणार आहे. यूपीएससीचे अधिकृत संकेतस्थळ upsconline.nic.in वरून हे अर्ज करता येतील. यूपीएससी एनडीएसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत १९ जानेवारी २०२१ आहे. जे उमेदवार यशस्वीपणे आपला ऑनलाइन अर्ज भरतील, त्यांना UPSC NDA 1 परीक्षेला बसण्याची संधी मिळेल. ही परीक्षा १८ एप्रिल २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

पात्रता –

राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या सैन्य दलासाठी – उमेदवार बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य.

राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या वायू आणि नौदलासाठी – बारावी किंवा समकक्ष परीक्षेत फिजिक्स आणि गणित विषयांसह उत्तीर्ण.

निवड प्रक्रिया –  उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणीच्या आधारे होईल.

यूपीएससी एनडीएसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख  – १९ जानेवारी २०२१

परीक्षेची तारीख – १८ एप्रिल २०२१

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – upsconline.nic.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स  थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com