कोरोना काळात नोकरी गमावलेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने राज्यातील वेगवेगळ्या २७५ कंपन्यांशी संपर्क साधून ४३ हजार ३४ जागांवर बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नोकरी गमावलेले आणि नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांना या जागांसाठी अर्ज करता येणार आहे. या ठिकाणी दहावी उत्तीर्णपासून ते अभियांत्रिकीपर्यंत शैक्षणिक पात्रता असलेल्या तरुणांना जास्तीत जास्त सुमारे १८ हजार रुपयांची नोकरी मिळू शकणार आहे.

या रिक्त जागांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून ऑनलाइन मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी १३ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार असल्याचे या विभागाच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी सांगितले. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. दहावी आणि बारावी उत्तीर्ण, आयटीआय, पदविका, अभियांत्रिकी आदी शैक्षणिक पात्रता असलेल्या तरुणांना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. ऑनलाइन पसंतीक्रम नोंदवणाऱ्यांनाच या मेळाव्यामध्ये सहभागी होता येणार आहे’ असे पवार यांनी स्पष्ट केले.

‘या मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या २७५ कंपन्यांमध्ये रूप पॉलिमर्स, मिडा कॉर्पोरेशन, अॅषडविक हायटेक, फोर्स मोटर्स, वायका इन्स्ट्रुमेन्ट्स, विल्यम्स कंट्रोल्स, जयहिंद सियाकी, कायनेटिक कम्युनिकेशन, शार्प डिझायनर्स अॅसण्ड इंजिनिअर्स आदी प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे’, असे पवार यांनी सांगितले.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर 2020

ऑनलाईन नोंदणी करा – www.rojgar.mahaswayam.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी – https://careernama.com