मोठी बातमी! 15 ऑक्टोबर पासून देशात सर्वत्र शाळा होणार सुरु; महाराष्ट्राचं काय?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाचे संकट पाहता अद्याप राज्यातील शाळा सुरु करण्यात आल्या नाही आहेत. नुकतेच राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा १ नोव्हेंबर पासून सुरु करणार असल्याचे सांगितले आहे. आता केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनीही देशात १५ ऑक्टोबर पासून शाळा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. कोरोनाच्या संकटपार्श्वभूमीवर प्रत्येक राज्य सरकारला त्यांच्या राज्याची परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याबबात निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असणार आहे.  अशी माहिती समोर आली आहे.  शाळा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. विविध राज्यांच्या शालेय शिक्षणमंत्र्यांना त्याची अंमलबजावणी करायची आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी स्पष्ट केले आहे.  केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जेईई आणि नीट या प्रवेश परीक्षा यशस्वीपणे राबवल्याचा उल्लेखही यावेळी रमेश पोखरियाल यांनी केला. लाखोच्या संख्येने विद्यार्थ्यांनी नियमानुसार परीक्षा दिल्या. तसेच विविध राज्यांमध्ये आता महाविद्यालयीन अंतिम वर्षांच्या परीक्षाही सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. शाळा सुरू करण्यापूर्वी पालक आणि शाळांनाही विश्वासात घेण्याची सूचना देण्यात आली आहे. सुरक्षा आणि शिक्षण हे दोन्ही गरजेचं असून याचा समतोल राखत मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करा असे आवाहन केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी केले आहे.

महाराष्ट्रात याआधीच शालेय शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. मात्र, त्यासाठी काही नियम-अटीही घोषित करण्यात आल्या आहेत. “विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागातील आणि शहरांपासून दूरवरील शाळा प्रत्यक्ष सुरु कराव्यात. तसंच, दुसरीकडे ऑनलाईन, डिजिटल पद्धत पायलट प्रॉजेक्ट म्हणून तातडीने राबवावी,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. ज्या ठिकाणी शाळा प्रत्यक्ष सुरु होत आहेत, तिथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्री म्हणाले होते. आता लवकरच शाळा सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत.

९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरु करणार – बच्चू कडू

टाॅप माॅडेल अन् मिस इंडिया फायनलिस्ट अशी झाली IAS; देशात 93 वा नंबर

नववी नापास झालेल्या मराठमोळ्या मुलाच्या यशाची कथा नववीच्याच पाठपुस्तकात

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा(https://careernama.com)