UPSC CMS परीक्षेची तारीख जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Combined Medical Services Examination 2020) कम्बाइंड मेडिकल सर्व्हिस परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ADMO, GDMO आणि ज्युनिअर स्केल पदांसाठी ही परीक्षा होणार आहे. यूपीएससीमार्फत 22 ऑक्टोबर 2020 रोजी ही परीक्षा होणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन पेपर असतील. या परीक्षेत नकारात्मक गुणांकन असेल याचीही उमेदवारांनी नोंद घ्यावी. वस्तुनिष्ठ प्रकारच्या प्रश्नांसाठी उमेदवारांचे चुकीच्या उत्तरांसाठी गुण कापले जातील.

(Combined Medical Services Examination) परीक्षेचे अॅडमिट कार्ड परीक्षा सुरू होण्यापूर्वी तीन आठवडे आधी उमेदवारांना मिळणार आहे. ई-अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी उमदेवारांनी रजिस्ट्रेशन आयडी, जन्मतारीख, नाव, वडिलांचं नाव आदि माहिती भरायची आहे. उमेदवारांनी त्यांचे ई-अॅडमिट कार्ड काळजीपूर्वक वाचावे आणि जर कोणत्या चुका असतील तर त्या यूपीएससीच्या लक्षात आणून द्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

जर उमेदवार त्यांच्या ई-अॅडमिट कार्ड मध्ये दिलेल्या परीक्षा केंद्राऐवजी अन्य परीक्षा केंद्रावर गेला आणि तेथून त्याने त्याचा पेपर दिला, तर तो वैध मानला जाणार नाही. ई-अॅडमिट कार्ड यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. या संकेतस्थळाची लिंक पुढे देण्यात येत आहे. अॅडमिट कार्ड पोस्टाने पाठवले जाणार नाही, याची उमेदवारांनी दखल घ्यावी.लेखी परीक्षा संगणकआधारित पद्धतीने होणार आहे. या परीक्षेचे एक डेमो मॉड्युल देखील यूपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

परीक्षेची तारीख – 22 ऑक्टोबर 2020

पेपर 1 – जनरल मेडिसीन अँड पेडिअॅट्रिक्स – 9:30 ते 11: 30

पेपर 2 –  अ) सर्जरी, ब) गायनॅकॉलॉजी अँड ऑबस्टेट्रिक्स क) प्रिव्हेन्टिव्ह अँड सोशल मेडिसीन  – दु. 2 ते 4

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com