वर्षभराचं ऑनलाईन शिक्षण आता केवळ ७०८ रुपयांत ; ‘सुगत लर्निंग’चा अभिनव उपक्रम

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा | कोरोना महामारीमुळे समाजातील अनेक घटकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा घटक आहे शिक्षण. गाव-खेडं असुदे किंवा मोठी शहरं, दुर्गम आदिवासी पाडे असोत किंवा मेट्रो सिटीज – सर्वांनाच ऑनलाईन शिक्षणाचा बदल स्वीकारावा लागत आहे. साताऱ्यातील सुगत लर्निंग अकॅडमीने या अडचणीतही अधिक विद्यार्थ्यांना माफक पैशांत शिक्षण देण्याचं व्रत हाती घेतलं आहे. इयत्ता ८ वी ते १० वी च्या कोणत्याही वर्गाची, गणित आणि विज्ञान विषयाची वार्षिक ऑनलाईन शिकवणी केवळ ७०८ रुपयांत द्यायला सुगत अकॅडमीने सुरुवात केली आहे. या अभिनव उपक्रमाची जबाबदारी सुमित सुनीता सुभाष आणि सोनम पोवार या तरुण शिक्षकांनी घेतली असून या प्रकल्पाची अधिक माहिती त्यांनी दिली आहे.

सध्याच्या कोरोनामुळे ओढवलेल्या परिस्थितीत ऑनलाईन शिक्षणपद्धती जम बसवत आहे. परंतु अजूनही, शालेय पातळीवर ऑनलाईन शिक्षणप्रणाली ही केवळ व्हिडिओ लेक्चर्स या माध्यमाभोवती फिरताना दिसत आहे. खरं तर शालेय वयोगटातील मुलांना त्यांचा अभ्यासक्रम केवळ समजून घेणे पुरेसे नाही, तर त्यासोबत महत्त्वाचा मुद्दा उरतो तो सरावाचा! अशावेळी मुलांना / विद्यार्थ्यांना व्हिडीओसोबतच योग्य सराव करून घेणारे माध्यम अतिशय फायदेशीर ठरेल.

याच सर्व गोष्टींचा विचार करून, sugatlearning.com  ही वेबसाईट काम करते. या वेबसाईटवर मुलांना व्हिडिओ लेक्चर सोबतच विस्तृत प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी गृहपाठ दिला जातो. तसेच, मुलांची स्पर्धा परीक्षांची तयारी होण्याकरिता बहुपर्यायी प्रश्नांचा सराव देखील करून घेतला जातो. या वयोगटाच्या एकाग्रतेचा वेळ लक्षात घेऊन व्हिडीओ लेक्चरची लांबी २०-२५ मिनिटे एवढीच ठेवण्यात आली आहे. थोडक्यात, विद्यार्थ्याला व्हिडिओ लेक्चर सोबतच बहुपर्यायी प्रश्न संच आणि विस्तृत प्रश्नांचा संच दिला जातो. अर्थात,आपण जो अभ्यास करतो आहे, तो योग्य मार्गावर चालला आहे का, हे तपासणे देखील गरजेचे आहे. त्यासाठीच, या सर्व प्रश्नांची विस्तृत उत्तरे देखील मुलांना त्याच वेबसाईट वर उपलब्ध असतात. असे जरी असले, तरी मुलांना शंका उरतातच. त्यामुळेच मुलांना पडणाऱ्या शंकांचे निरसन करण्याची सोय देखील या वेबसाईटवर आहे.

वार्षिक शिक्षणाची अधिक माहिती मिळवण्यासाठी –  sugatlearning.com वेबसाईट वरील एका पाठाच्या शेवटी मुलांकडे त्या संपूर्ण पाठाचे व्हिडिओ लेक्चर्स, २०-३० बहुपर्यायी प्रश्न आणि ४०-५० विस्तृत प्रश्न असा मोठा खजिना असतो.

हे सर्व जरी असले तरी महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे आर्थिक बाजू! परंतु, दर्जेदार शिक्षण कोणत्याही आर्थिक स्तरात अडकून न राहता सर्वांपर्यंत पोहचले पाहिजे, हा आमचा या साईटमागचा हेतू असल्याचं सुमित आणि सोनम यांनी सांगितलं. या उपक्रमांतर्गत संपूर्ण वर्षभराच्या गणित आणि विज्ञानाच्या एकत्रित अभ्यासक्रमाची फी नाममात्र ७०८ रुपये आहे.

विज्ञानविषयक डेमो लेक्चर पाहण्यासाठी –
https://youtu.be/Tkxm7sJbjXs

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, मुलांना पूर्ण वेळ मोबाईल उपलब्ध असेलच, अशी शक्यता कमी असते. हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न ‘सुगत’ने केला आहे. सुगतचे व्हिडिओ लेक्चर कमी कालावधीचे असल्यामुळे दिवसातून कोणत्याही वेळेला मुलांकडे ३०-४० मिनिटे मोबाईल उपलब्ध असला, तरी त्यांचा अभ्यास होऊ शकतो. पालकांना, मुलांना ऑनलाईन पैसे देताना बऱ्याचदा अडचण येते, काही शंका असतात. या सर्व शंकांसाठी तुम्ही थेट शिक्षकांशी बोलून त्या सोडवू शकता. पैसे भरण्याचे ऑनलाईन सोडून इतरही मार्ग उपलब्ध असल्याने पालकांना याची चिंता करण्याचं कारण नाही.

शिक्षणक्षेत्रातील हा नवीन बदल समजून घेऊन त्यात सहभागी व्हायचं असेल तर sugatlearning.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क – 84210-27310

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”