Anganwadi Bharti: नवीन अंगणवाडी भरती; महिलांसाठी 3 विविध पदे आणि नियमांसह अर्ज करण्याची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करियरनामा ऑनलाईन। महिलांसाठी सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. महिला आणि बालविकास विभाग अंतर्गत अंगणवाडी मधील विविध पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. यामध्ये मदतनीस,परिवेक्षिका आणि मुख्य सेविका ही पदे भरली जाणार आहेत. (Anganwadi Bharti) अर्जप्रक्रिया सुरू झाली असून येत्या 100 दिवसात ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच ज्या महिलांची ऑगस्ट 2022 मध्ये मदतनिस म्हणून निवड करण्यात आली त्या महिला जर 10 वी उत्तीर्ण असतील तर त्यांची थेट सेविकापदी निवड नियुक्ती केली जाणार आहे. त्याचबरोबर या नवीन भरती प्रक्रियेसाठी काही नियम आणि अटी देखील दिलेल्या आहेत. या भरती संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेवूयात.

पदाचे नाव –

मदतनीस, परिवेक्षिका आणि मुख्य सेविका पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता –

12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रत्येक पदासाठी वेगवेगळी पात्रता निश्चित करण्यात आली आहे.

वयोमर्यादा –

18 ते 35 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे. (Anganwadi Bharti)

आवश्यक प्रमाणपत्र –

महिलांनी या भरतीचा अर्ज करण्यापूर्वी स्वतःच निवासी प्रमाणपत्र म्हणजेच रहिवासी दाखला काढून ठेवावा.

अर्ज पद्धती – ऑफलाईन (Anganwadi Bharti)

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 18 फेब्रुवारी 2025

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

हे पण वाचा – राष्ट्रीय मानव अधिकार आयोगात सरकारी नोकरीची संधी; अर्जप्रक्रिया जाणून घ्या