IOCL Apprentice Recruitment 2025: IOCL अंतर्गत मोठी भरती जाहीर; जाणून घ्या अर्जप्रक्रियासह संपूर्ण माहिती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करियरनामा ऑनलाईन। इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) भारतातील सर्वात मोठ्या तेल आणि गॅस कंपन्यांपैकी एक आहे. भारतीय तेल क्षेत्रामध्ये तिचा महत्त्वपूर्ण रोल आहे. (IOCL Apprentice Recruitment 2025) याच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांच्या एकूण 200 रिक्त जागा भरण्यात येत आहेत. तसेच या पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2025 ही दिलेली आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खालील दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘ट्रेड अप्रेंटिस’, ‘टेक्निशियन अप्रेंटिस’, ‘ग्रॅज्युएट अप्रेंटिस’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (IOCL Apprentice Recruitment 2025)

या पदांसाठी एकूण 200 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

  • ट्रेड अप्रेंटिस – 55
  • टेक्निशियन अप्रेंटिस – 25
  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस – 120

    शैक्षणिक पात्रता –

    शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

    वयोमर्यादा –

    उमेदवारांना 18-24 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

    अर्ज पद्धती – ऑनलाईन (IOCL Apprentice Recruitment 2025)

    अर्ज कसा करावा?

    • जो उमेदवार दिलेले पात्रता निकष पूर्ण करत असेल आणि NATS/NAPS अप्रेंटिसशिप पोर्टलवर नोंदणीकृत असतील, ते 17 जानेवारी 2025 (सकाळी 10:00 वाजता) ते 16 फेब्रुवारी 2025 (रात्री 11:55 वाजेपर्यंत) NAPS/NATS पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. संबंधित पोर्टलचा दुवा E (2) अ आणि ब मध्ये दिला आहे.
    • उमेदवारांनी त्यांच्या आयडी/ईमेल आयडीद्वारे NATS/NAPS पोर्टलवर लॉगिन करून इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अप्रेंटिसशिप संधीसाठी अर्ज करावा.
    • अपूर्ण किंवा जाहिरातीच्या अटी आणि शर्तींशी अनुरूप नसलेल्या अर्जांना नाकारले जाऊ शकते.
    • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी त्यांच्या प्रोफाइलमधील सर्व माहिती (जात, शैक्षणिक तपशील, वैयक्तिक माहिती इत्यादी) आणि एकूण टक्केवारी योग्यपद्धतीने दाखवलेली आहे याची खात्री करावी. यामध्ये काही सुधारणा आवश्यक असल्यास, उमेदवारांनी NATS/NAPS कार्यालयाशी संपर्क साधावा.
    • इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी NATS/NAPS पोर्टलवर योग्य पद्धतीने संबंधित पोस्टसाठी अर्ज केला आहे याची खात्री करावी.

    अर्ज करण्याची अंतिम तारीख – 16 फेब्रुवारी 2025

    महत्वाच्या लिंक्स –

    • अधिक माहितीसाठी PDF पहा.
    • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा. (टेक्निशियन अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस)
    • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा. (ट्रेड अप्रेंटिस)
    • अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी क्लिक करा.

    सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

    हे पण पहा – UCO Bank Recruitment 2025: युनायटेड कमर्शियल बँक (UCO) द्वारा मोठी भरती जाहीर; पात्रता काय ? अर्ज कसा कराल ?