Big News : मोडी लिपी शिका आणि शिकता शिकता 10 हजार कमवा; सरकारची मोठी योजना

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकार तसेच केंद्र सरकार (Big News) वेळोवेळी विद्यार्थी आणि नागरिकांसाठी विविध योजना आणत असते. या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक यांसारख्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना मिळत असतो.समाजातील प्रत्येक वर्गातील लोकांचा सामाजिक स्तर सुधारण्यासाठी शासन नियमित नवनवीन योजना आणत असतात. विद्यार्थ्यांचे हित जोपासण्यासाठी सरकारने एक वेगळी योजना आणलेली आहे. ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडी लिपी प्रशिक्षण प्रकल्प योजना’ असं या योजनेचं नाव असे आहे. यामध्ये नागरिकांना मोडी लिपीचे शिक्षण शासनामार्फत दिले जाणार आहे.

शासनाच्या ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडी लिपी प्रशिक्षण प्रकल्प’ योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोडी लिपीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे हे प्रशिक्षण घेता घेताच विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्यावेतनही मिळणार आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव (Big News) विकास संस्था (सारथी) च्यावतीने मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी ही योजना आखण्यात आली आहे. मराठा कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलेअर उमेदवारांसाठी ही योजना असणार आहे. यातून मराठा कुणबी समाजास मोठा फायदा होवू शकतो.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता
1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘सारथी’च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. या वेबसाईट वरुन विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.
2. उमेदवार मराठी, कुणबी असणं आवश्यक आहे.
4. तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
5. उमेदवार नॉन क्रिमिलेअर असणे गरजेचे आहे.

कोणकोणती कागदपत्रे आवश्यक
1. उमेदवाराकडे सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र असावे.
2. जातीचे प्रमाणपत्र नसल्यास ईडब्ल्यूएस किवा एसईबीसी प्रमाणपत्र असावे.
3. जन्माचा दाखला किवा 10 वीचे प्रमाणपत्र.

महिन्याला मिळणार 10 हजारांचे विद्यावेतन
या प्रशिक्षणासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांसाठी दरमहा 10 हजार रुपयांचे विद्यावेतन देण्यात येणार आहे.
अभ्यासक्रमाचा कालावधी
सावत्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या या अभ्यासक्रमाचा कालावधी २ महिन्यांचा ६० ऑनलाइन तासांचा आहे. यामध्ये मर्यादित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.

काय आहे योजनेचा उद्देश (Big News)
शाहू महाराजांच्या काळातील कोल्हापूर संस्थानमधील पारित ठराव, प्रशासकीय अहवाल, यातील काही दस्तऐवज मोडी लिपीत आहेत. हे अहवाल प्रकाशित करण्याचा मानस सारथीचा असून, याचाच एक भाग म्हणून मराठा कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलेअर उमेदवारांसाठी ही योजना आखण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com