करिअरनामा ऑनलाईन । UPSC ESIC नर्सिंग ऑफिसर भरती 2024 साठी (UPSC ESIC Recruitment 2024) अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे दि. 7 जुलै रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यापुर्वी आयोगाने UPSC ची अधिकृत वेबसाईट upsconline.nic.in वर उमेदवारांचे हॉल तिकिट ऑनलाइन प्रसिद्ध केले आहे. अर्जदार वेबसाइटवरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. या भरती परीक्षेद्वारे कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये नर्सिंग ऑफिसरच्या एकूण 1 हजार 930 रिक्त पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
असं डाउनलोड करा प्रवेशपत्र (UPSC ESIC Recruitment 2024)
1. UPSC ESIC नर्सिंग ऑफिसर ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी प्रथम upsconline.nic.in या वेबसाइटला भेट द्या. 2. वेबसाइटच्या होम पेजवर E-Admit Card for Nursing Officer in Employees State Insurance Corporation, 2024 या लिंकवर क्लिक करा.
3. आता पुढील पानावर Click Here वर क्लिक करून पुढे जा.
4. नोंदणी आयडी किंवा रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
5. माहिती सबमिट करताच, तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर उघडेल जिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि प्रिंटआउट घेऊ शकता.
परीक्षेला जाताना हे लक्षात ठेवा…
UPSC ESIC नर्सिंग ऑफिसर भरती परीक्षा देणाऱ्या सर्व (UPSC ESIC Recruitment 2024) उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर जाताना आपल्या हॉल तिकिट, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आणि वैध ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट) यापैकी एक सोबत ठेवावे. याद्वारे उमेदवाराची ओळख पटवली जाणार आहे. या कागदपत्रांशिवाय तुम्हाला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com