UPSC Update : UPSC पूर्व परीक्षेचा पॅटर्न बदलणार? पहा मोठी अपडेट

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने यावर्षी दि. 16 जून (UPSC Update) रोजी नागरी सेवा परीक्षेची पूर्व परीक्षा घेतली आहे. एका रिपोर्टनुसार UPSC ने या परीक्षेच्या पेपरमध्ये काही नवीन प्रश्न विचारले आहेत. हे पाहता येत्या काही वर्षांत UPSC CSE परीक्षेचा पॅटर्न बदलू शकतो; अशा चर्चा होवू लागल्या आहेत.

परीक्षेच्या पद्धतीत बदल होण्याचे संकेत (UPSC Update)
यावर्षी UPSC प्रिलिम्स परीक्षेने आगामी वर्षांच्या परीक्षेच्या पद्धतीत होणाऱ्या बदलांबद्दल मोठे संकेत दिले आहेत. 2023 च्या प्राथमिक परीक्षेवर नजर टाकली तर त्यात अनेक नवीन प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते. ज्यामध्ये स्टेटमेंट रिलेशन आणि करेक्ट इन करेक्ट असे अनेक प्रश्न होते. याशिवाय 2021 मध्ये (UPSC Update) दोन विधानांमधील संबंधाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर 2022 मध्ये हा प्रश्न विचारला गेला नाही. यावर्षी UPSC ने प्रिलिम्स 2024 प्रश्नपत्रिकेत दोन नवीन प्रकारचे प्रश्न विचारले आहेत. यापैकी एक प्रश्न तीन विधानांमधील संबंध आणि दुसरे ज्यामध्ये तीन कॉलममध्ये मॅच करावे लागेल होते. येत्या काही वर्षांत UPSC असेच अनेक प्रश्न विचारू शकेल; असे मानले जात आहे.

पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांतून UPSC CSE परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना जावे लागते. प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी निवडले जातात. मुख्य परीक्षेनंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. या तीन टप्प्यांनंतर, UPSC निवडलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करते. यावर्षी प्रिलिम्स परीक्षा पार पडली असून, त्यानंतर आता उमेदवारांनी मुख्य परीक्षेची तयारी सुरू केली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com