Career Success Story : रॉकेलच्या दिव्याच्या उजेडात अभ्यास करून बांधकाम मजूर बनला पोलीस अधिकारी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सब-डिव्हिजनल ऑफिसर म्हणून (Career Success Story) कार्यरत असलेले संतोष कुमार पटेल पूर्वी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील घाटिगाव येथे डेप्युटी सुप्रीटेंडंट ऑफ पोलीस म्हणून कार्यरत होते. त्यांचा यशस्वी होण्याचा प्रवास खूप खडतर आहे. त्यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. आई-वडील शेती आणि मोलमजुरी करत असत. त्यांचं कुटुंब एका खोलीच्या झोपडीवजा घरात रहात होतं. पावसाळ्यात हे घर गळत असे. त्यात पुस्तकंही भिजून फाटून जात असत. पण या सगळ्या अडचणींवर संतोष यांनी मात केली. रात्री रॉकेलच्या दिव्याच्या उजेडात अभ्यास करत संतोष यांनी परिस्थिती बदलली आणि सब-डिव्हिजनल ऑफिसरपदापर्यंत मजल मारली.

…..मेहनतीला पर्याय नाही
संतोष (Santosh Kumar Patel) यांनी खूप हालाखीच्या परिस्थितीत दिवस काढले आहेत. आजही ते जुने दिवस आठवल्यानंतर संतोष यांना गहिवरून येते. सरकारकडून मिळणारं थोडंफार धान्य आणि घरच्या शेतात पिकणारं थोडंफार धान्य यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. मात्र या परिस्थितीमुळे (Career Success Story) संतोष खचून गेले नाहीत. घर चालवण्यासाठी आईवडील करत असलेले काबाडकष्ट बघून त्यांनी आईवडिलांना मदत करायचं ठरवलं. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी संतोष लहानपणापासूनच मोलमजुरी करु लागले. कधी ते बांधकामाच्या ठिकाणी मजुरी करत तर कधी तेंदूपत्ता विकायला जात. अभ्यास करुन नोकरी मिळवायची असेल तर मेहनतीला पर्याय नाही, शिक्षण आणि नोकरी याच गोष्टींच्या बळावर आपण गरिबीतून वर येऊ शकतो, हे खूप लहान वयातच त्यांना समजलं होतं.

पैसे नाहीत म्हणून शिक्षण थांबू दिलं नाही (Career Success Story)
कठीण परिस्थितीवर मात करत अभ्यास करुन संतोष शालान्त परीक्षेत जिल्ह्यात पहिले आले. त्यांच्या या यशामुळे कुटुंबासह ग्रामस्थांनाही त्यांचा अभिमान वाटतो. पैसे नसल्यामुळे पुढचं शिक्षण घेता येणार नाही अशी परिस्थिती आली तरी संतोष यांनी आपल्या हिमतीवर शिक्षण सुरु ठेवलं. त्यांनी मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. त्यात उत्तम गुण मिळवत ते पोलीस अधिकारी झाले.

पोलिसांची प्रतिमा उजळवण्याची इच्छा
लहानपणापासून सोसलेले गरीबीचे चटके लक्षात ठेवून पोलीस सेवेत दाखल झाल्यानंतर आपल्या समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न त्यांनी कधीही सोडला नाही. त्यांनी बैतूलमध्ये दारुबंदी (Career Success Story) अभियान राबवलं. आपल्या कामातून सतत समाजाला दिशा देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पोलिसांबद्दल समाजात असलेले गैरसमज बदलून पोलिसांची प्रतिमा उजळवण्याची त्यांना इच्छा आहे. जर तुम्ही ठरवलं तर कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करुन यश मिळवू शकता हे संतोष यांच्या उदाहरणावरुन स्पष्ट होतं.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com