करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारने मराठा समाजाला (Big News) लागू केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने विविध पदांची भरती प्रक्रिया रद्द केली आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या हजारो उमेदवारांमध्ये संताप निर्माण झाला आहे. महापारेषण अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 2 हजार 541 पदांच्या भरतीसाठी भरती 2023 जाहीर झाली. त्यानुसार मोठ्या संख्येने इच्छुक पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले असताना अंतिम टप्प्यात ही परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
राज्याच्या महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण विभागाने वेगवेगळ्या 2 हजार 541 पदांची भरती प्रक्रिया अचाकन रद्द केली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्याकडून संताप व्यक्त केला जात आहे. वेगवेगळ्या (Big News) पदांसाठी जवळपास 80 टक्के परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाली असताना अचानक सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषणने मध्येच संपूर्ण परीक्षा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे परीक्षार्थी विद्यर्थ्यांचा संताप उफाळून आला आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली मात्र विद्यर्थ्यांचे समाधान झाले नाही.
विविध संवर्गातील 2 हजार 541 पदांसाठी होणार होती भरती (Big News)
महापारेषण अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 2 हजार 541 पदांच्या भरतीसाठी 2023 साली भरती जाहीर झाली होती. त्यानुसार मोठ्या संख्येने इच्छुक पात्र उमेदवारांनी 10 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज केले होते. दरम्यान आरक्षण स्थितीची पुनर्गणना केल्यानंतर, कंपनीकडून नवीन जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे कंपनीचे स्पष्ट केले आहे. पण ‘ही आपली शुध्द फसवणूक असल्याची परीक्षार्थी विद्यार्थ्यांची भावना आहे.
ऐनवेळी भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्यामुळे परिक्षार्थी विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळे आता सरकार यावर काय भूमिका घेणार? यावर काही तोडगा निघणार का? तोडगा काढलाच तर तो काय असेल, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
जाहिरात प्रसिध्द झालेली तारीख आणि रद्द झालेली परीक्षा
4-10-2023 – कार्यकारी अभियंता
4-10-2023 अतिरिक्त कार्यकारी अभियंता
4-10-2023 उपकार्यकारी अभियंता
4-10-2023 सहाय्यक अभियंता (दूरसंचार)
4-10-2023 सहाय्यक अभियंता
20-11-2023 वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली)
20-11-2023 तंत्रज्ञ- १
20-11-2023 तंत्रज्ञ- २ (Big News)
20-11-2023 विद्युत सहाय्यक (पारेषण, कंत्राटी)
19-1-2024 सहाय्यक अभियंता
31-1-2024 वरिष्ठ तंत्रज्ञ
31-1-2024 तंत्रज्ञ- १
31-1-2024 तंत्रज्ञ- २
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com