करिअरनामा ऑनलाईन । काही लोक त्यांची स्वप्ने पूर्ण (UPSC Success Story) करण्यासाठी अथक परिश्रम घेतात आणि त्यांची स्वप्ने पूर्ण झाल्यावरच निश्चिंत राहतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उमेदवाराची प्रेरणादायी गोष्ट सांगणार आहोत, जीने कोणत्याही कोचिंग क्लासला न जाता भारतातील सर्वात कठीण UPSC नागरी सेवा परीक्षा पास करून IPS पद मिळवले आहे. आपण बोलत आहोत IPS अधिकारी अंशिका वर्मा (IPS Anshika Verma) बद्दल. तिने आपल्या कामगिरितून कर्तुत्व सिध्द केले आहे. तिची कहाणी तुम्हालाही निश्चित प्रेरणा देईल.
अभियांत्रिकीमध्ये घेतली पदवी
आपण बोलत आहोत उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील रहिवासी असलेल्या अंशिका वर्माबद्दल. तिने आपले प्राथमिक शिक्षण नोएडामध्ये पूर्ण केले आहे. यानंतर तिने नोएडाच्या गलगोटियास कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, जिथून तिने 2018 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक पदवी प्राप्त केली आहे.
कोचिंगशिवाय केली UPSC ची तयारी (UPSC Success Story)
पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, अंशिकाने प्रयागराजमध्ये राहून 2019 मध्ये UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. तिने तिचा संपूर्ण वेळ तिच्या अभ्यासासाठी समर्पित केला. कठोर परिश्रम आणि पूर्ण समर्पणाने, अंशिकाने केवळ दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवले. 2020 मध्ये झालेल्या UPSC नागरी सेवा परीक्षेत तिने संपूर्ण भारतातून 136 वा क्रमांक मिळवला आणि ती IPS अधिकारी बनली.
सध्या आहे गोरखपूरची SP
अंशिका 2021 बॅचच्या उत्तर प्रदेश केडरची अधिकारी आहे. सध्या (UPSC Success Story) ती गोरखपूरमध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) म्हणून कार्यरत आहे. तिच्या प्रोफेशनसोबतच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर त्याचे 257K फॉलोअर्स आहेत.
यशाचे संपूर्ण श्रेय पालकांना देते
IPS अंशिका वर्माने तिच्या यशाचे संपूर्ण श्रेय तिच्या कुटुंबाला दिले आहे, त्यात तिचे वडील जे उत्तर प्रदेश विद्युत निगम लिमिटेड (UPEL) चे निवृत्त कर्मचारी आहेत आणि तिची आई जी गृहिणी आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com