करिअरनामा ऑनलाईन । काही तरुण-तरुणी असे असतात जे त्यांनी (Career Success Story) मिळवलेल्या यशामुळे फक्त आपल्या आई वडिलांचेच नाही तर संपूर्ण शहराचे, जिल्ह्याचे आणि सोबतच परिसराचे नाव मोठे करतात. त्यांच्यामुळेच आयुष्यात उभारी घेणाऱ्या तरुणाईला प्रेरणा मिळते. आज आपण अशा एका तरुणीची यशोगाथा वाचणार आहोत. आस्था चौबे (Aastha Chaubey) असं या तरुणीचं नाव आहे. तिचे वडील कनिष्ठ लिपिक आहेत तर आस्थाने नायब तहसीलदार बनून आपल्या आयुष्यातील उत्तुंग कामगिरी करून दाखवली आहे.
अभ्यासासाठी स्वत: नोट्स तयार केल्या
आस्थाने स्वतःवर विश्वास ठेवत सेल्फ स्टडी करण्यावर भर दिला. तिने अभ्यासासाठी स्वत: नोट्स तयार केल्या, जुन्या प्रश्नपत्रिकांची वारंवार उजळणी केली. तिचे सातत्याने प्रयत्न (Career Success Story) सुरु होते. तिने सलग तीनवेळा मध्यप्रदेश राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. सुरवातीच्या 2 परीक्षांमध्ये तिला अपयश आले पण तिसऱ्या प्रयत्नात तिला भरघोस यश मिळाले. आस्थाने तिच्या भावासोबत इंदूरमध्ये राहून अभ्यास केला. तिचा भाऊ सुध्दा MPPSC परीक्षेची तयारी करत आहे. आस्थाला दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत.
पदवी नंतर सुरु केली स्पर्धा परीक्षेची तयारी
आस्थाचे वडील रामनरेश चौबे हे सागरपासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या हिलगन गावचे रहिवासी आहेत. ते विद्यापीठात कनिष्ठ लिपिक पदावर काम करत होते. एक वर्षापूर्वी ते सेवेतून निवृत्त झाले आहेत. आस्था हिने केंद्रीय विद्यालय, ढाना येथून 12 वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर तिने B.Sc पूर्ण केली. पदवीच्या शिक्षणानंतर तिने स्पर्धा परिक्षेची तयारी सुरू केली.
न्यायालयात दिला लढा (Career Success Story)
आस्था तिने दिलेल्या लढ्याविषयी बोलताना सांगते की, “2019 च्या परीक्षेत मी पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षा पास केल्या. मात्र नंतर पूर्व परिक्षेच्या पडताळणीमध्ये मला गुणवत्ता यादीतून बाहेर केले गेले. यामुळे मला न्यायालयीन लढा द्यावा लागला. मला अनेकवेळा कोर्टात फेऱ्या माराव्या लागत होत्या. यादरम्यान अनेक समस्यांना सामोरे जावे लागले, तसेच एकत्र कुटुंब असल्याने खर्च मोठा होता. घरची आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की अभ्यास आणि न्यायालयीन लढाई लढण्यासाठी पैसे उरतील. पण अशा सर्व परिस्थितीवर मात केली आणि नंतर मला न्यायालयीन लढाई जिंकता आली.” आता आस्थाची नायब तहसिलदारपदी निवड झाली आहे. ती हे पद जबाबदारीने सांभाळत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com